Fridge cleaning tips: आजकाल स्वयंपाक एका वस्तुची जागा ठरलेलीच असते. घर नवे असो किंवा जुने ही वस्तु नेहमीत घरात दिसते. या वस्तुचे नाव 'फ्रिज'. फ्रिजचा वापर दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टींसाठी केला जातो. फ्रिजमध्ये अन्नपदार्थ, भाज्या ठेवण्यामुळे ते दीर्घकाळ टीकता. पण, जास्त वापरामुळे फ्रिज लवकरच अस्वच्छ होतो. अशा वेळी वेळेवर स्वच्छता न केल्यास फ्रिजमध्ये विषाणू (बॅक्टेरिया) वाढू लागतात.
परिणामी, फ्रिजची नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. जर वेळोवेळी फ्रिजची स्वच्छता केली नाही, तर अस्वच्छतेमुळे अनेक घातक आजार होऊ शकतात. अशा मुळे योग्य वेळी फ्रिज साफ करत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे फ्रिज स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या टिप्स आताच जाणून घ्या.
1. स्विच ऑफ करा: फ्रिज साफ करण्यापूर्वी त्याचा स्विच बंद करा. त्यामुळे फ्रिज चांगल्याप्रकरे स्वच्छ करता येईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही. त्यानंतर सर्व भाज्या, फळे बाहेर काढा.
2. कापड लावा: फ्रिजखाली जाड कापड किंवा पेपर ठेवा. त्यामुळे साफसफाई करताना पाणी बाहेर पडले तरी जमीन खराब होणार नाही.
3. पाणी वापरा: फ्रिज स्वच्छ पाण्याने पुसा. पुसल्यानंतर फ्रिज एक तासासाठी उघडा ठेवा. जर वास येत असेल, तर पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करून स्वच्छता करा.
4. ट्रे धुवा: फ्रिजमधील ट्रे बाहेर काढून साबणाच्या पाण्याने नीट धुवा.
एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात मीठ टाका. त्यामध्ये कापड भिजवून फ्रिज आतून स्वच्छ करा. जर डाग काढता येत नसतील, तर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाका आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हा मिश्रण वापरून डाग सहजच काढता येतील.
हे ही वाचा: गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भागावरही पडते खळी? 'हा' कोणता आजार तर नाही ना?
दररोज फ्रिज ओल्या कापडाने पुसा. पाण्याचा स्प्रे करून सुक्या कापडाने स्वच्छ करा. यामुळे फ्रिजच्या दारावर डाग लागणार नाहीत.
असे सोपे उपाय केल्याने फ्रिज स्वच्छ ठेवण्यात मदत होईल.