मुलींपेक्षा मुलांचीच उंची जास्त का असते? निरीक्षणातून अखेर समोर आलं नेमकं कारण

Men vs Women Height: सर्व प्रश्नांची उत्तरं अखेर मिळाली. महिला आणि पुरूष यांच्या उंचीत तफावत का असते? जाणून घ्या निरीक्षणात नेमकं काय म्हटलंय...   

सायली पाटील | Updated: Jan 27, 2025, 11:50 AM IST
मुलींपेक्षा मुलांचीच उंची जास्त का असते? निरीक्षणातून अखेर समोर आलं नेमकं कारण  title=
Why Men Taller Than Women what study reveales

Men vs Women Height: निसर्गाचे काही नियम असतात आणि या निसर्गाच्या नियमांचा थेट परिणाम जीवसृष्टीवर होत असतो. अगदी मानवी जीवनापासून मानवी शरीरापर्यंत हे नियम लागू होत असतात. याचच एक उदाहरण म्हणजे महिला आणि पुरुषांची शरीररचना. स्त्री- पुरुष समानतेचा मुद्दा कितीही महत्त्वाचा असला तरीही शारीरिक रचनेच्या बाबतीत मात्र इथं अनेक फरक आढळून येतात. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे महिला आणि पुरुषांच्या वजन आणि उंचीतही कायमच फरक असतो. पण, असं नेमकं का? 

एकसमान आहार, कामं आणि तत्सम गोष्टी आजुबाजूला घडत असूनही शरीरावर या साऱ्याचा परिणाम मात्र विविध फरकानं का होताना दिसतो? यामागे आहेत काही महत्त्वाची कारणं. 

हार्मोन्स 

शारीरिक विकासावर हार्मोन्सचा सर्वाधिक परिणाम होताना दिसतो. अनेकदा हार्मोन्स कमी किंवा जास्त झाल्यानं शरीर असामान्यपणे वाढीसही लागू शकतं किंवा त्याची वाढ थांबूही शकते. लहान वयात एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन हार्मोन स्त्री आणि पुरुषांमध्ये समप्रमाणात विकसित हतात. पण, किशोरावस्थेपर्यंत त्यांचं प्रमाण बदलू लागतं ज्यामुळं स्नायूंच्या वाढीस वाव मिळतो. मुलींमध्ये किशोरावस्थेत एस्ट्रोजनची पातळी कमी होऊन यामुळं ग्रोथ हार्मोन विकसित होणं थांबतं आणि उंचीवर याचा परिणाम होतो. पुरुषांच्या बाबतीत मात्र याच्या विपरित क्रिया होताना दिसते. 

जनुकीय कारणं 

स्त्री आणि पुरुषाच्या उंचीमध्ये असणाऱ्या फरकामागे काही जनुकीय कारणंही असतात. एखाद्या कुटुंबाचच उदाहरण घेतलं तर त्यामध्ये घरातील महिलांची उंची पुरुषांच्या उंचीपेक्षा कमी असल्याचं दिसून येतं. यचा परिणाम वर्तमान आणि भविष्यावरही होताना दिसतो. 

असं म्हणतात की, पुरुष सुरुवातीला अधिक शक्तिशाली आणि उंच असत. यामागचं कारण म्हणजे तेव्हा पुरुष शिकारीसारखी कामं करत असत. पण, काळानुरूप हे बदल होत गेले आणि आज जो माणूस दिसतो अशी धाटणी विकसित झाली. 

हेसुद्धा वाचा : क्रिसभाऊनं जिंकलं! अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहता एका क्षणात रचलं गाणं... Video पाहाच 

पुरुष कधीकाळी दुपटीनं उंच होते... 

जाणून आश्चर्य वाटेल पण, बायोलॉजी लेटर्स पत्रिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार पुरुषांची उंची गतकाळात महिलांच्या तुलनेत दुपटीनं होती. एका अहवालातून समोर आलेल्या वृत्तानुसार महिलांच्या उंचीत सरासरी होणारी वाढ 1.68 सेमी इतकी होती तर, पुरुषांमध्ये हेच प्रमाण 4.03 सेमी इतकं दिसून आलं. महिलांचं वजन सरासरी 2.70 किग्रॅ नं वाढलं तर, पुरुषांमध्ये हे प्रमाण 6.48 किग्रॅ असल्याचं लक्षात आलं.