'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा

Big Announcement By Chhaava Director Laxman Utekar: 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमधील डान्सवरुन वाद सुरु असतानाच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मोठी घोषणा केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 27, 2025, 01:10 PM IST
'संभाजी महाराज नाचले नसतील असं वाटत असेल तर...'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर उतेकरांची मोठी घोषणा title=
राज ठाकरेंच्या भेटीनंतर नोंदवलं मत

Big Announcement By Chhaava Director Laxman Utekar: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटामधील गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधाना येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाची जितकी चर्चा आहे तितकाच आक्षेप छत्रपती संभाजी महाराज नाचताना दाखवण्यात आल्याने निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे मराठमोळे दिर्गदर्शक लक्ष्मण उतेकरांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण उतेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

...म्हणून राज ठाकरेंची भेट घेतली

राज ठाकरेंना 'शिवतिर्थ' या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर लक्ष्मण उतेकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंची भेट का घेतली? या प्रश्नावर लक्ष्मण उतेकरांनी, "राज ठाकरेंचं वाचन दांडगं आहे. त्यांचं इतिहासाचं ज्ञान चांगलं आहे. त्यांचं महाराजांसंदर्भात वाचन आहे. त्यामुळे सिनेमात नेमके काय बदल करायला हवेत हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. या चर्चेनंत त्यांनी मला काही सूचना केल्या आहेत. त्या अगदी चांगल्या सूचना आहे. त्यांनी छान मार्गदर्शन दिलं आहे. त्यासाठी राज ठाकरेंचं धन्यवाद," असं प्रसारमाध्यमांना उत्तर देताना म्हटलं. 

राज ठाकरेंचा सल्ला ऐकणार आणि...

ज्या डान्सवरुन वाद झाला आहे त्यावरूनही लक्ष्मण उतेकरांना प्रश्न विचारण्यात आला. 'छावा' चित्रपटामधील छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतानाची दृष्यं डिलिट करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर लक्ष्मण उतेकरांनी राज ठाकरेंनी हाच सल्ला दिल्याचं म्हटलं आहे. "लेझिम खेळतानाची दृष्यं आम्ही डिलिट करणार आहोत. राज ठाकरेंनी हाच सल्ला दिला," असं लक्ष्मण उतेकर म्हणाले. 

नक्की वाचा >> 'मागील 4 वर्षांपासून..', संभाजीराजे, उदयराजेंनी 'छावा'वर आक्षेप घेतल्याचं ऐकताच उतेकर म्हणाले, 'कळकळीची..'

लोकांना वाटत असेल की महाराज नचले नसतील तर...

"कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. त्या डान्समुळे कोणाच्या भावना दुखावत असतील, कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील तर आम्ही ते (डान्सचं दृष्यं) वगळू. कारण तो चित्रपटाचा मोठा भाग नाही. तो आम्ही नक्कीच डिलिट करु," असा शब्द लक्ष्मण उतेकरांनी दिला.