'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं...

Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 27, 2025, 12:13 PM IST
'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास...' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं... title=
(Photo Credit : Social Media)

Uday Samant on Chhava Movie : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलच्या 'छावा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याच्यावर आता मोठा वाद झाला आहे. राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना नाचताना दाखवलेल्या सीनवर आक्षेप घेतला होता. त्यानंतरच चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करा असं त्यांनी म्हटलं. आता नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात इतिहास दाखवण्यात आला आहे. त्यानिमित्तानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला असता. त्यावेळी ते म्हणाले की 'माझं दिग्दर्शकांशी बोलणं झालं नाही ना माझं निर्मात्यांशी बोलणं झालं. माझं छत्रपती उदय राजेंशी बोलणं झालं आणि माझं संभाजी राजेंशी बोलणं झालं. त्या मतासाठी आम्ही एका विचारावर का आहोत. कारण निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. नजरचुकीनं असा सीन जर अनावधानं हा सीन आला असेल तर तो डिलीट करावा ही सगळ्यांची भूमिका आहे. त्या मताचा मी देखील आहे. त्या मतानं मी सहमत आहे.'

हेही वाचा :  'लहान तोंडी मोठा घास', 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरवर मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला...

छावा या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्यावर उदय सांमत यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली होती. 'धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!', अशी पोस्ट उदय सामंत यांनी केली होती.