Maharashtra Politics : मराठी माणूस आणि हिंदुत्व ही मनसेची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. राज ठाकरेंनी (raj thackeray) नाशिकमधील मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कोणाशीही युती न करण्याचे संकेत दिले आहेत. तर, मनसेबाबत प्रतिक्रीया देताना फडणवीसांनी सूचक विधान केले.
मनसेने घेतलेली व्यापक भुमिका आमच्याशी विसंगत नाही. त्यामुळे क्षेत्रीय अस्मिता आम्हाला मान्य आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे मुद्दे मांडले पाहिजेl. सोबतच व्यापक भुमिका असावी असं आमचं मत होत. आज हिंदुत्वाची भुमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या व आमच्या भूमिकेत फार काही अंतर राहील नाही. बाकी निवडणूकीत काय करायचं या गोष्टी तपशील व चर्चेच्या असतात त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवार आणि अजित पवार गट आतून एकच असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. हे दोघेही जनतेला मुर्ख बनवत आहेत. आपल्याला आपलीच पोरं कडेवर खेळवायची आहेत. दुस-यांची पोरं मांडीवर खेळवायची नाहीत. निवडून आलेल्यांची मोळी पवार बांधतात, हेच पवार आतापर्यंत करत आल्याची टीका राज ठाकरेंनी केली. यावेळी राज ठाकरेंनी पक्षांतर करणा-यांवर हल्लाबोल चढवलाय.
मशिदींवरच्या भोंग्यांवरुन राज ठाकरे पुन्हा एकदा कडाडले आहेत. माझ्या हातात सत्ता द्या, सगळे भोंगे बंद करतो असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. त्यानंतर कोणाची हिम्मत होते भोंगे लावायची म्हणत राज ठाकरेंनी थेट इशाराच दिलाय.. भोंग्यावरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरही तोफ डागलीय.. आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.
महायुतीचं जागावाटप लवकरच पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय...दिल्लीतील बैठक सकारात्मक झालीये...एकाच बैठकीत सर्व निर्णय होतील अशी परिस्थिती नाही...80 टक्के काम झालंय...20 टक्के बाकी आहे...फोनवरून चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणालेत...