Crime News : सात महिन्यांच्या गर्भवतीचा हुंड्यामुळे गेला जीव; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Sambhaji Nagar : कामावरुन परतल्यानंतर विवाहित महिला आपल्या खोलीत गेली होती त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. महिलेच्या पतीने संध्याकाळी दार उघडले असता त्याला या घटनेची माहिती मिळाली

Updated: Feb 5, 2023, 04:37 PM IST
Crime News : सात महिन्यांच्या गर्भवतीचा हुंड्यामुळे गेला जीव; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल  title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : देशात हुंडा (dowry) घेणे आणि देणे हा कायद्याने गुन्हा असला, तरी आजही हुंड्यासाठी मुलींचा छळ सुरु असल्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. हुंडा प्रतिबंधक कायद्याला (Dowry Prohibition Act) 60 पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झालेली असतानाही पुरोगामी महाराष्ट्रात आजही हुंडाबळी जात आहेत. राज्यात दरवर्षी सरासरी 200 विवाहितांनी हुंडीबळीमध्ये आपला जीव गमावला आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) घडलाय.

सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून सहा महिन्याची गर्भवती असलेल्या 30 वर्षीय सहायक प्राध्यापिकेने टोकाचं पाऊल उचललं आहे. राहत्या घरी गळफास घेऊन या महिलेने आत्महत्या केली आहे. संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील गजानन कॉलनी भागात हा सर्व प्रकार घडला आहे. वर्षा दीपक नागलोत असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी तपास करत सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पती दीपक राजाराम नगलोत, सासरा राजाराम महाजन नगलोत, सासू देविका राजाराम नगालोत आणि नणंद वैशाली निखिल जरवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासरकडील मंडळींची नावे आहेत. सातत्याने ही लोक वर्षाकडे हुंड्यांची मागणी करत होते. आतापर्यंत आम्ही बारा लाख रुपये हुंडा दिला आहे, अशी माहिती वर्षाच्या कुटुंबियांनी दिली आहे. मात्र सासरच्यांनी 15 लाखांची मागणी केली होती. तीन लाख बाकी असल्यामुळे तिचा छळ सुरू होता. तिला माहेरी सुद्धा येऊ दिले जात नव्हते. सासरी तिचा छळ होऊ लागल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हुंडा देण्याचं मान्य केलं होतं. मात्र वर्षाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.