Malvani chand nawab Viral Video: सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध, कोकणातील प्रतिपंढरपूर (Pratipandharpur) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेला (Bharadi Devi's Yatra) सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी अनेक भाविक मोठी गर्दी करत असतात. मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमानी दाखल होत असतात. या यात्रेसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देश विदेशातून भाविक येत असतात. अशातच या यात्रेसाठी आलाय एक खास रिपोर्टर (Chand Nawab)...त्याचं नाव चांद नवाब. (Viral Video of malavani chand nawab reporting from Bharadi Devi Yatra Sindhudur Trending video on Social Media)
चांद नवाब ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. तोच चांद नवाब का? जो पाकिस्तानच्या कराचीमधून रिपोर्टिंग (Karachi reporter) करतो. तर नाही... हा नवा चांह नवाब (Chand Nawab) आपल्या कोकणातील आहे. एका मालवणी तरुणाने (Malvani Chand Nawab) पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब याच्या स्टाईलने रिपोर्टिंग केली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय.
आणखी वाचा - Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
एक तरुण मुलगा स्टेशनच्या बाहेर फुटओव्हर ब्रिजवर उभा असलेला दिसतोय. त्याच्या हातात एक बुम आहे. पाकिस्तानमधील (Pakistan) प्रसिद्ध पत्रकार चांद नवाबच्या स्टाईलने मराठीमध्ये वृत्त वार्तांकन करताना दिसतोय. त्यावेळी अनेक लोकं तिथून जात असतात. मुंबईतून मालवणात भराडी देवीच्या जत्रेसाठी आलेल्या भाविकांची गर्दी आपल्या कोकणातील (Kokan) आहे, असं तो सतत म्हणताना दिसतोय. त्यामुळे कॅमेरामनला पुन्हा रिटेक घ्यावा लागतोय.
जत्रा-द-फीवर-ए-आंगणेवाडी pic.twitter.com/TbkWUloXII
— Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) February 3, 2023
दरम्यान, तरुणांपासून अनेकजण त्याला त्रास देताना दिसतायेत. मात्र, ओरिजन आणि डुब्लिकेट चांद नवाब (Duplicate Chand Nawab) यांच्यात थोडा ट्विस्ट आहे. व्हिडिओच्या अखेरीस रिपोर्टरचा मित्र म्हणतो, अरे रिपोर्टिंग काय करत बसलाय, तिकडं वीआयपी तिकीट मिळतंय. त्यानंतर दोघेही तातडीने निघून जातात. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी तयार करण्यात आलाय. बजरंगी भाईजानमध्ये नवाजुद्दीन सिद्दकीने (Nawazuddin Siddiqui) चांद नवाबचं पात्र साकारलं होतं. त्यानंतर आता नवा मालवणी चांद नवाब आलाय.