आशीष अम्बाडे, झी मीडिया
चंद्रपूरः नगीनाबाग परिसरात वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. (Women Death) वृद्ध महिलेच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुनेच हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. (Crime News In Marathi)
चंद्रपूर शहरातील नगीनाबाग परिसरात वृद्ध महिलेची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरुसोबत त्यांचे दोन महिन्यांच्या थकीत भाड्यावरून किरकोळ वाद झाल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यामुळं पोलिसांचा त्यांच्यावर संशय होताच. मात्र ठोस पुराव्यांच्या आभावी पोलिसांनी ठोस पावलं उचलली नव्हती.
शर्मिला सकदेवे असं ६५ वर्षीय खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. त्यांचं बौद्ध विहार परिसरात २ मजली घर आहे. काल त्या घरी एकट्या असताना संध्याकाळी शेजाऱ्यांना त्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागातून निवृत्त झालेल्या त्यांच्या पतीचं महिन्याभरापुर्वीच निधन झालं होतं तर विवाहित असलेली मुलगी नागपुरात राहते.
12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?
काल दुपारी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूसोबत त्यांचे दोन महिन्यांच्या थकीत भाड्यावरून भांडण झाले होते आणि याच भांडणात आरोपी अनुप कोहपरे याने महिलेचा गळा दाबून खून केला.
जगातील सर्वात उंच शिव मंदिराला धोका?, १२,८०० फुट उंचीवर वसलेले तुंगनाथ मंदिर ६ अंशाने झुकले
शेजाऱ्यांनी आरोपी आणि महिलेमध्ये झालेल्या वादाबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अनुप कोहमरेला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अखेर हत्येची कबुली दिली. पोलिसांनी अनुपला अटक केली असून पुढील तपास करत आहे.
करणी केल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री एका कुटुंबावर शेजाऱ्यानेच तलवारीने हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. सेंट्रींग कामगार असणाऱ्या आझाद मुकबुल मुलतानी (वय वर्षे 50) याचा खून करण्यात आला आहे. आपल्या सासऱ्यावर होणारे वार अडविण्यासाठी गेलेली सून असिफ मुलतानी ( वय वर्ष 22) या देखील हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. शेजारी राहणाऱ्या संशयित निखिल गवळी ( वय वर्ष 22) यांने स्वताहून पोलिसात हजर होवून पोलिसांना खून केल्याची कबुली दिली आहे. शेजारील आझाद मुलतानी करणी करीत असल्यामुळे त्यांचा खून केल्याची कबुली आरोपीने राजारामपुरी पोलीसांना दिली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.