Chhagan Bhujbal Interview: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत शायरीतून सूचक संकेत दिले आहेत. "रात नहीं ख्वाब बदलता है...मंजिल नही बदलती, कारवाँ बदलता है..." अशी शायरी करत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नक्की काय असा सवाल उपस्थित होत आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत छगन भुजबळ यांनी हे विधान केलं आहे.
छगन भुजबळ यांनी मुलाखतीदरम्यान 'रात नहीं ख्वाब बदलता है...मंजिल नही बदलती, कारवाँ बदलता है, ज्जबा रखो जीतने का क्योंकि, किस्मत बदले न बदले पर वक्त जरूर बदलता है' अशी शायरी ऐकवली. कारवाँ बदलणार का असं विचारलं असता त्यांनी आपल्याला हे कोणीतरी हातात दिलं, म्हणून बोलून गेलो. अलीकडे मी शेर वैगेर म्हटलं की लोकांना बरं वाटतं असं ते म्हणाले. मला कारवाँचा काही अर्थ माहिती नव्हता असंही ते म्हणाले. छगन भुजबळ इतके नाराज असतानाही राष्ट्रवादीत का आहेत? असं विचारलं असता त्यांनी बघू असं म्हटलं.
याच मुलाखतीत त्यांनी 'बदल जाओ वक्त के साथ, या वक्त को बदलना सीखो... मजबूरियों को मत कोसो हर हाल में चलना सीखो' अशी शायरी करत राजकीय वाटचालीबाबत सूचक विधान केलं आहे. त्यांनी शायरीतून हे संकेत दिले असल्याने त्यामुळे छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे... ते काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता माझ्याकडे दुसरा काही कामधंदा नाही आहे. मंत्रीपदाची जबाबदारी नाही, काही नाही त्यामुळे छंद पुरवतो. थोड्या कविता, शायरी, मित्रांसह गप्पा मारत असतो असंही ते म्हणाले.