बुलढाणा : अखिल भारतीय साहित्य समेलन यंदा विदर्भात रंगणार आहे. यंदाचे साहित्य संमेलन कोठे रंगणार याबाबत गेली अनेक दिवस चर्चा आणि उत्सुकत हाती. दरम्यान, निवडसमितमध्ये झालेल्या मतदानात ५ विरूद्ध १ अशा मतदानाने विदर्भावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि महामंडळाच्या स्थळनिवड समितीची बैठक नागपूर येथे रविवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा संमेलनाचे ९१वे वर्ष आहे. गेल्या वर्षी डोंबिवली येथे ९०वे समेंलन पार पडले होते.
यंदाच्या साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान हिवरा आश्रमाला मिळाला. हिवरा आश्रम हे विदर्भाच्या प्रवेशद्वारावरच आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर साहित्यप्रेमींचा मेळा भरणार आहे. दिल्ली, बडोदा आणि बुलढाणा या तीन ठिकाणांवरून संमेलनाच्या आयोजनासाठी मागणी आली होती.