Aaditya On Raj Thackeray: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) आता जोरदार तयारीला सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गटाध्यक्षांना संबोधित केलं. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणूक (BMC Election) स्वबळावर लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे स्वत: राज ठाकरे यांनी तोफ हातात घेऊन उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली होती. त्यावर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एका वाक्यात विषय संपवला आहे.
राज ठाकरेंच्या बाबतीत मी बोलणार नाही, आम्हाला दु:ख झालंय. परिवार म्हणून आमच्या वेदना आहेत. आजोबांचे (Balasaheb Thackeray) खाणे पण त्यांनी काढलं होतं, मला त्यात काही जायचं नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. काका पुतण्या असा नवा वाद आता निर्माण होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
शिंदे सरकार (Shinde Govt) हे अल्पायुषी सरकार आहे, म्हणून उद्योगधंदे महाराष्ट्रात येत नाहीत. सर्वांना माहिती आहे, हे सरकार टिकणार नाही. गद्दार आमदार मनासारखे वागतात, तर दडपशाही देखील करतात. उद्योगमंत्र्यांचा खात्याशीच संबंध नाही, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) आपला मोर्चा राज ठाकरेंकडे वळवला होता.
आणखी वाचा - Raj Thackeray: मनसे कुणासोबत युती करणार? राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!
दरम्यान, 2014 साली ज्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections) लागल्या होत्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली गेली नाही, असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. तर बाळासाहेबांना तेलकट बटाटेवडे खायला देत होते आणि मी त्यांना चिकन सूप पाठवायचो, असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भर सभेत म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांनी हा विषय लावून धरला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी आज पलटवार केलाय.