सूपमध्ये भात, वेटरचा घात! सासरवाडी खानावळीत घडली धक्कादायक घटना

सासरवाडी मटण खानावळीत दोघे मित्र जेवणासाठी आले होते. यावेळी त्यांनी सूप ऑर्डर केले. त्यांना दिलेल्या सूपमध्ये भात आढळून आल्याने दोघांचा पारा चढला.

Updated: Nov 17, 2022, 06:08 PM IST
सूपमध्ये भात, वेटरचा घात! सासरवाडी खानावळीत घडली धक्कादायक घटना title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड:  सूपमध्ये(soup) भात आढळल्यानं दोघांनी वेटरची हत्या केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील(Pimpri Chinchwad) पिंपळे सौदागर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

सासरवाडी मटण खानावळीत दोघे मित्र जेवणासाठी आले होते. यावेळी त्यांनी सूप ऑर्डर केले. त्यांना दिलेल्या सूपमध्ये भात आढळून आल्याने दोघांचा पारा चढला. दोघांनी वेटरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका वेटरचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी दोन वेटर जखमी झाले आहेत. या मारहाणीचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

वेटरला मारहाण करणारे कॅमेऱ्यात कैद

विजयराज वाघेरे(वय - 22)  असे या घटनेतील मुख्य आरोपीचे नाव आहे. या  घटनेनंतर तो आपल्या साथीदारासह घटनास्थळावरुन फरार झालाय. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. 

मंगेश संजय पोस्ते अस खून झालेल्या १९ वर्षीय वेटरच नाव आहे. तर, अजित अमूत मुठकुळे आणि सचिन सुभाष भवर अशी जखमी वेटरची नाव आहेत. या हत्ये प्रकरणी विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.