New Year 2025 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या हिशोबाने काही ना काही बेत ठरवत आहेत. न्यू इयर म्हटलं की, पार्टी आलीच...नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभरातील हॉटेल्स, बार, आणि रिसॉर्ट सज्ज झाले आहेत. त्या एका रात्रीमध्ये करोडी लिटर दारु जिरवली जाते. पार्ट्यांमध्ये मद्यपानाचं सेवन ही सामान्य बाब झाली आहे. या पार्ट्यांमध्ये दारूचे सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. मजा मस्ती, डान्स करत दारूचं सेवन केलं जातं त्यावेळचा हा आनंद खूप छान वाटतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उठतो तेव्हा हँगओव्हरमुळे आपण त्रस्त होतो. डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि आळस यामुळे आपल्या दुसरा दिवस खराब होतो. पण नवीन वर्षांची रात्र गाजवल्यानंतर नवीन वर्षांचा पहिला दिवस हँगओव्हर शिवाय चांगल्या सकाळसाठी प्रसिद्ध डॉक्टरांनी काही खास टिप्स दिल्या आहे.
DailyMail.com वृत्तानुसार, पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉ. नीना चंद्रशेखरन यांनी सोशल मीडियीवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात त्यांनी दारूचं सेवन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हँगओव्हर होऊन नये म्हणून टिप्स दिल्या आहेत. डॉ. नीना सांगतात की, हँगओव्हर होऊ नये म्हणून तुम्ही दारूसोबत चकना म्हणून चीजचं सेवन केलं पाहिजे.
डॉ. नीना यांच्या मते, चीज हे एक दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये प्रथिने, चरबी आणि निरोगी कर्बोदके जास्त प्रमाणात आढळतात. याचं सेवन केल्यामुळे पोटाला एका प्रकारचे आवरण मिळतो. या आवरणामुळे दारूचं शोषण कमी होतं. त्यामुळे अल्कोहोल शरीरात गेल्यावर त्याचा चयापचय क्रियेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. चीज देखील पोषक तत्वांचा पुरवठा करते, त्यात व्हिटॅमिन बी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी चीज खाणे फायदेशीर मानले जाते.
दारू सेवन करण्याआधी योग्य आहार करावे.
चीजसोबत सुका मेवा आणि फळाचं सेवन नक्की करा.
प्रत्येक ड्रिंकनंतर पाणी प्या.
1 ग्लास दारू प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने अल्कोहोलचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.
दारु हे कोल्ड ड्रिंक आणि कॉकटेलमध्ये घेऊ नका.
दारुचं सेवन करत असताना तुम्ही लिंबूपाणीचेही सेवन करु शकता.
सर्वात महत्त्वाचं रात्री झोपण्यापूर्वी नारळ पाणीचं सेवन करा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)