गणित शिकवणारी भारतीय तरुणी झाली Adult Content क्रिएटर; इंजिनिअरिंग सोडण्याचं कारण...

Who Is Adult Content Creator Zara Dar: सोशल मीडियापासून जगभरातील अनेक नेटकऱ्यांमध्ये सध्या झारा दार हे नाव चांगलेच चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 28, 2024, 03:00 PM IST
गणित शिकवणारी भारतीय तरुणी झाली Adult Content क्रिएटर; इंजिनिअरिंग सोडण्याचं कारण... title=
तिनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती (फोटो- इन्स्टाग्रामवरुन साभार)

Who Is Adult Content Creator Zara Dar: परदेशात शिकणाऱ्या प्रत्येक अनिवासी भारतीयाला दोनच गोष्टींची अपेक्षा असते. एक तर एखाद्या चांगल्या कॉर्परेट कंपनीमध्ये परदेशात नोकरी मिळावी किंवा परदेशातील एखाद्या चांगल्या विद्यापीठामधून शिकून चांगल्या कंपनीत काम मिळावं. मात्र या पारंपारिक विचारसणीचा झारा दार या भारतीय वंशाच्या तरुणीने छेद दिला आहे. युट्यूबवर आतापर्यंत गणिताचे क्लास घेणारी आणि पीएचडीच्या अभ्यासक्रम शिकणाऱ्या झाराने आता अडल्ट कंटेटकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. झाराने नुकतीच अडल्ट कंटेट वेबसाईट असलेल्या 'ओन्लीफॅन्स'वर आपलं अकाऊंट सुरु केलं आहे. झारा आता पूर्णवेळ अटल्ट कंटेट क्रिएटर झाली आहे.

अचानक अडल्ट कंटेटकडे का?

कंप्युटर इंजिनिअरची पदवी घेतलेल्या झाराने आपल्या लिंक्डइन अकाऊंटवरुन अडल्ट कंटेटकडे आपण वळत असल्याच्या निर्णयासंदर्भातील माहिती देणारा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. शैक्षणिक वाटचाल अचानक अशी मध्यात थांबवून अचानक अश्लील कंटेट बनवण्याकडे आपण कसे काय वळलो याबद्दल झाराने भाष्य केलं आहे. 

अभ्यास सोडण्याचा निर्णय कठीण

अभ्यास सोडण्याचा आपला निर्णय आपल्याला वाटला त्यापेक्षाही अधिक कठीण होता, असं झाराने म्हटलं आहे. "अभ्यास सोडायचा हे ठरवल्यानंतर मी फार रडले. हा निर्णय फारच तणाव देणारा आहे," असं झाराने म्हटलं आहे. तसेच या वेळेस तिने या भलत्याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय फसला तरी त्याचा फटका आपल्याला बसणार असल्याची कल्पना असल्याचं म्हटलं आहे. "मी कधीतरी विचार करते की 'ओन्लीफॅन्स'ची सदस्य होण्याचा निर्णय हा जुगार खेळल्यासारखा तर नाही ना?" असंही झारा म्हणाली आहे.

...ते मला फार आवडलं असतं

"मी लिंक्डइन ओपन करते तेव्हा माझ्या वयाचे तरुण तरुणी त्यांच्या वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये मजल दरमजल करत असल्याचं दिसत आहे. ते पाहून मला फार ईर्षा वाटू लागली," असंही झाराने म्हटलं आहे. मात्र अजूनही आपण छान सुटाबुटामध्ये कॉर्परेट ऑफिसमध्ये जात असल्याचा विचार करतो. अशा कंपन्यांमध्ये काम करुन वेगवेगळ्या समस्यांवर उत्तरं शोधण्याचं काम करणं मला फारच आवडलं असतं, असंही झाराने या व्हिडीओत नमूद केलं आहे. 

कॉर्परेटमध्ये भीतीही तेवढीच

झाराने आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर निशाणा साधला आहे. "मात्र कॉर्परेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या कष्टाचं त्यांना श्रेय दिलं जातेच असं नाही. अनेकदा कष्ट करणाऱ्यांना श्रेय मिळत नाही. त्याचं काम जिंकतं मात्र प्रसिद्धी आणि संपत्ती इतरांच्या वाट्याला जाते," अशी खंत झाराने बोलून दाखवली आहे. "कॉर्परेटच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा नोकरीवरुन काढून टाकण्याचं टेन्शन असतं. ते त्यांच्या पगारानुसार आयुष्य जगतात. बिलं भरणं, कर्ज फेडणं यासारख्या गोष्टींबरोबरच त्यांच्या फिरण्याचे दिवसही मिळणाऱ्या सुट्ट्या आणि पगारावर अवलंबून असतात," असं झारा म्हणाली. 

नव्या प्रोफेशनमध्ये स्थिरता नसली तरी...

आपल्या 'ओन्लीफॅन्स'च्या माध्यमातून सुरु केलेल्या नव्या प्रोफेशनमध्ये स्थिरता नसली तरी इथे जे काही आहे ते आपल्या मनानुसार करता येणार असल्याचं समाधान वाटतं असं झाराने म्हटलं आहे. 

प्रयोगमधून इथे आले होते

प्रयोग म्हणून आपण 'ओन्लीफॅन्स'वर आलो होतो. मात्र इथे मिळणारा नफा हा प्रचंड असल्याचं जाणवलं असंही झाराने म्हटलं आहे. कमी वेळात तिला एक मिलियन डॉलर्सची कमाई करता आली. यामधून त्यांनी कर्ज फेडण्याबरोबरच कारही खरेदी केली. "आता मी बरीच गुंतवणूक केली असून लवकरच घर विकत घेणार आहे," असं झाराने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.