नववधूला जोरजोरात फुलं फेकून मारणाऱ्यांना भटजीने शिकवला धडा! स्टेजवरचा Video पाहाच

Viral Video Indian Wedding: हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहेच. मात्र तितकेच आश्चर्य व्हिडीओमधील लोकांनाही वाटत असल्याचं दिसतंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 28, 2024, 01:57 PM IST
नववधूला जोरजोरात फुलं फेकून मारणाऱ्यांना भटजीने शिकवला धडा! स्टेजवरचा Video पाहाच title=
सोशल मिडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे

Viral Video Indian Wedding: सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये लग्नसराईचा सिझन सुरु आहे. भारतीय लग्न पद्धतीचा लग्नसोहळा म्हणजे धम्माल आणि खूप सारी मज्जा ही आलीच. लग्न समारंभादरम्यान अनेक मजेदार घटना घडतात. सोशल मीडियावर तर लग्नातील गंमतीजंमतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. लग्नामध्ये गोंधळ उडाला नाही तर लग्न झाल्यासारखं वाटत नाही, असं या व्हायरल व्हिडीओंवर म्हणणारे अनेकजण आजूबाजूला सापडतील. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला असून तो अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

भलतेच काहीतरी घडले

लग्न म्हटलं की भटजीबुवा हवेच. भटजींचं काम मंत्रोच्चार करत लग्न लावून देण्याचं असतं. नव दांपत्याला शुभ अशिर्वाद देतं भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देईपर्यंत सर्वकाही प्रथे-परंपरेनुसार पार पडत आहे ना, याची जबाबदारी या भटजींच्या खांद्यावर असते. लग्नाच्या सिझनमध्ये भटजीही लवकर मिळत नाहीत. या काळात भटजी फारच बिझी असतात. सततची लग्न आणि सोहळ्यांना हजर राहून राहून कधीतरी मंचावरच भटजींचा संयम सुटतो आणि त्यांच्याकडून काहीतरी विचित्र घडून जातं.

नक्की गुरुजींनी केलं काय?

स्टेजवर लग्न सोहळ्यादरम्यान वरमालेचा कार्यक्रम झाल्यानंतर सात फेऱ्यांचा विधी सुरु असताना वर आणि वधूपासून काही अंतरावर असलेली टवाळ मित्रांची टोळी सवयीप्रमाणे मित्राला त्रास देण्याच्या हेतूने फुलरुपी अक्षदा अगदी जोरजोरात फेकून मारत होते. हा प्रकार बराच वेळ सुरु होता. वर आणि वधूला त्रास देण्याच्या नादात या लोकांनी फेकलेली फुलं बाजूला उभ्या असलेल्या भटजींनाच लागत होती. त्यांनी बराच वेळ हे सहन केलं. मात्र अखेर त्यांच्या संयम सुटला आणि भटजीने थेट हातातली फुलांची ताटलीच या मुलांच्या दिशेने रागात फेकून मारली.

तुम्हीच पाहा व्हिडीओ...

एक्सवरील (आधीच्या ट्वीटरवरील) @gharkekalesh या हॅण्डलवरुन "गुरुजी आणि लग्न सोहळ्यादरम्यान जोरजोरात फुलं फेकून मारणाऱ्यांमध्ये स्टेजवरच वाद झाला," अशा कॅप्शनसहीत व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोरं मस्करी मस्करीमध्ये जोरात ताकदीने फुलं फेकून मारी लागली असता विरुद्ध बाजूला उभे असलेले गुरुजी संतापले आणि त्यांनी त्यांच्या हातातलं फुलांचं ताटच या तरुणांच्या दिशेने अगदी रागात फेकून मारलं. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

लोक म्हणे, 'गुरुजींमधला विराट जागा झाला'

मंचावर गुरुजींचा हा रुद्रावतार पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी यावर मजेदार मतं नोंदवली आहेत. एकाने गुरुजींमधला विराट कोहली जागा झाला असं म्हटलं आहे. अन्य एकाने, पंडिताला एवढा राग शोभत नाही. प्रेमाने बोलायला हवं होतं, असं म्हटलं आहे. त्यांनी एवढ्या जोरात फुलं फेकील आहेत की त्यांना भारताकडून ऑलिम्पिक्ससाठी पाठवा, असा सल्लाही एकाने दिलाय.