BOB SO Bharti 2025: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पदवीचे शिक्षण घेत असतानाच अनेकजण बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असतात. तुम्हीदेखील बॅंक भरतीसाठी इच्छुक असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजेच एसओची हजारो पदे भरली जाणार आहेत.
यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.
बॅंक ऑफ बडोदाच्या विविध शाखांमध्ये 1267 पदे भरली जाणार आहेत. बँक ऑफ बडोदा स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर अर्ज करता येणार आहे. यानंतर होम पेजवर 'करिअर्स' टॅबवर क्लिक करा. नवीन पेज ओपन झाल्यावर 'करंट ओपनिंग्ज' टॅबवर क्लिक करा. 'रिक्रूटमेंट ऑफ प्रोफेशनल्स ऑन रेग्युरल बेसिस ऑन वेरीयस डिपार्टमेंट' या लिंकवर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल. यानंतर स्वतःची नोंदणी करा आणि तुमचा अर्ज भरा.बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज शुल्क भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.अर्जाची प्रिंटआउट घ्या.
बँक ऑफ बडोदा एसओ भर्तीसाठी अर्ज करण्यासाठी बीओबी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा. बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर यासंदर्भातील तपशील देण्यात आला आहे. 17 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी कोणताही विलंब न लावता त्वरीत नोंदणी करून घ्यावी.
बँक ऑफ बडोदा एसओ भर्ती 2025 साठी 17 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी करू शकता.ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखत या निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. बँक ऑफ बडोदा भरती नोटिफिकेशनची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.