Karnataka Assembly Election Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Election 2023) निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) दणदणीत यश मिळालं. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसच्या हाती 134 जागा आल्या आहेत. तर भाजपला (BJP) 64 जागेवर समाधान मानावं लागलंय. भाजपचा सुपडा साफ केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पहायला मिळतंय. काँग्रसला बहुमत मिळालं असलं तरी आता राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरतंय मुख्यमंत्रीपद...
काँग्रेसने सत्ता स्थापन केली तर पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्रीपदाच्या (Who will be the CM of Karnataka?) शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). दोन्ही दिग्गज नेत्यांचं कर्नाटकात मोठा प्रस्त्य असल्याने काँग्रेसमध्ये अंतर्गत लढाईने जोर धरणार असल्याची शक्यता आहे. अशातच आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
मुख्यमंत्री कोण असेल यासाठी आमच्या पक्षात एक प्रक्रिया असते. कोणत्याही राज्यात निवडणूक झाल्यावर आम्ही त्या प्रक्रियेनुसार काम करतो आणि निर्णय प्रक्रिया होते. त्यानुसार आमदारांची बैठक बोलावली जाईल. केंद्रातून निरीक्षक बैठकीत भाग घेतात. बैठकीमधील निर्णय पक्षश्रेष्ठींना सांगितला जातो. राहुल गांधी आणि माझ्यासह बाकीचे नेते यावर चर्चा करतात .सर्व लोक मिळून त्यावर योग्य तो निर्णय घेतो. मुख्यमंत्री कोण असेल, यावर लगेच निर्णय घेतला जाणार नाही, असं मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge On Karnataka CM) यांनी म्हटलंय.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावर निवडणुकीआधी काँग्रेस कधीही जाहीर भूमिका मांडली नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळतंय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान झालं होतं. त्यानंतर आज 13 मे रोजी मतमोजणी पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह भाजपचे मोठे नेते कर्नाटकात प्रचारासाठी उतरले होते. मात्र कर्नाटकच्या जनतेने कौल मात्र काँग्रेसच्या पारड्यात दिलाय. त्यामुळे आता कर्नाटकात भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलंय.