karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) एकहाती सत्ता मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election) 224 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 136 जागांवर आघाडी घेतलीय. तर भाजपचा (BJP) सुपडा साफ झाला आहे. भाजपाला 64 जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं चित्र आहे. दक्षिण भारतात कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपाच्या हातात होतं, तेही आता निघून गंलय. या विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावण आहे. भाजपा कायक्रत्यांनी राज्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.
राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटकमधल्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आहे. त्यांनी कर्नाटकमधल्या जनतेचे आणि कर्नाटकमधल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत, त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. हेच चित्र देशात दिसेल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. आम्ही गरीबांच्या प्रश्नावर निवडणूक लढवली. आम्ही प्रेमाने ही लढाई जिंकलो. कर्नाटकात द्वेशाचा बाजार बंद झाला आहे, आणि प्रेमाची दुकानं सुरु झाली आहे. हा विजय कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर आम्ही कर्नाटकच्या निडणुकीत जनतेला पाच आश्वासनं दिली होती, ती पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करु असं वचनही त्यांनी दिलंय.
काँग्रेसची जोरदार मुसंडी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार 224 जागांपैकी 137 जागांवर काँग्रेसने मुंसडी मारली आहे. तर भाजप 63 जागांवर आघाडीवर आहे. जेडीसला 20 जागांवर आघाडी मिळाली आहे. इतर पक्षांना 6 जागांवर आघाडी आहे. कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान झालं होतं आणि 73.19 टक्के लोकांनी मत दिलं होतं.
बोम्मई म्हणतात 'पुन्हा येणार'
भाजप नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पराभव स्विकारत असल्याचं म्हटलंय. पण त्याचबरोबर पुन्हा येणार असल्याचंही सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगले प्रयत्न केले. पण आम्ही आमची छाप उमटवू शकलो नाही. हा निकाल आम्ही गांभीर्याने घेऊ तसंच पुढच्या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मजबूतीने परत येऊ असं बोम्मई यांनी म्हटलंय.
बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) ने कहा, 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) और पार्टी कार्यकर्ताओं सहित सभी के काफी प्रयासों के बावजूद हम अपनी छाप नहीं छोड़ पाए हैं.' उन्होंने आगे कहा, 'परिणाम आने के बाद हम विस्तृत विश्लेषण करेंगे. हम इन नतीजों को गंभीरता से लेंगे. अगले साल होने वाले लोकसभा चुनावों के लिए पार्टी को पुनर्गठित करने की कोशिश करेंगे और मजबूती के साथ वापसी करेंगे.'