दसऱ्याचा आनंद लुटताना कोसळला इमारतीचा हिस्सा

तेलंगाना येथे इमारतीचा मोठा हिस्सा कोसळण्याची दुर्देवी घटना घडली. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 30, 2017, 03:10 PM IST
दसऱ्याचा आनंद लुटताना कोसळला इमारतीचा हिस्सा  title=

निजामाबाद :   देशभरात सगळीकडे दसऱ्याचा आनंद लुटला जात आहे. पण असाच आनंद साजरा करत असताना निजामाबाद, तेलंगाना येथे इमारतीचा मोठा हिस्सा कोसळण्याची एक दुर्देवी घटना घडली. 

विजयादशमी साजरी करण्याच्या उत्साहावर विरजण पडले. व्हिडिओ नुसार, निजामाबाद मधील एका इमारतीत लोक दसरा सेलिब्रेशन करत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात इमारतीमध्ये लोक एकत्रित झाले होते. दरम्यान, एका इमारतीचा एक भाग लोकांच्या अंगावर पडला.तेलंगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्देवी अपघातात दोन जणांचा मृत्यू तर २० लोक जखमी झाले. यात मोठ्या प्रमाणावर लोकांचे नुकसान झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.