मुकूट घालून बाईकवर फिरणाऱ्या 'रावणा'वर कारवाई

 लाल किल्ला मैदानात होणाऱ्या रामलीला मध्ये तो रावणाची भूमिका करत आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 30, 2017, 11:28 AM IST
मुकूट घालून बाईकवर फिरणाऱ्या 'रावणा'वर कारवाई title=

नवी दिल्ली :  हेल्मेटऐवजी मुकूट घालून बाईकवरून फिरणाऱ्या अभिनेता मुकेश ऋषिवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. लाल किल्ला मैदानात होणाऱ्या रामलीला मध्ये तो रावणाची भूमिका करत आहेत.

इंडिया गेट परीसरात रावणाच्या पोशाखात मोटरसायकल चालवत असताना त्याचा एक व्हिडिओं व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली.मुकेशने दिल्लीच्या ट्रॅफिक पोलिस मुख्यालयात जाऊन दंड भरल्याची माहिती  एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. दिल्लीत होणाऱ्या रामलीला मध्ये अनेक मोठे स्टार भूमिका आहेत. या वर्षी, केंद्रीय मंत्री ते खासदार आणि आमदारांपर्यंत सर्वजण रामलीलाचा भाग बनले आहेत. दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी अंगदच्या भूमिकेत दिसणार आहेत. मनोज तिवारी यांनीही गेल्या वर्षीही रामलीलामध्ये सहभाग घेतला होता.

पंजाबचे खासदार असलेल्या सांसल केंद्रीय मंत्री विजय सांपला आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून रामलीला पाहण्यासाठी हजेरी लावतात. तसेच भाजपाचे सल्लागार शोभा विजेंद्र गुप्ताही या वेळी सहभागी झाल्या असून त्या अहिल्याची भूमिका करत आहेत.