ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपनंतर हे Code Word ठरतायत चर्चेचा विषय

जाणून घ्या, अशा अनेक शॉर्टफॉर्मचा अर्थ...

Updated: Aug 4, 2022, 08:08 PM IST
ललित मोदी आणि सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपनंतर हे Code Word ठरतायत चर्चेचा विषय title=

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय व्यवसायिक व आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. ललित मोदी यांनी आपल्या लेडी लव्ह सोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मिम्सचं वादळ सुरु झालं. यानंतर लगेचच मोदींनी आपला इन्स्टाग्राम बायो बदलून त्यातही सुष्मिताचा उल्लेख केला. मग, तर ट्रोलर्सनी आणि चाहत्यांनी कमेंट्स व पोस्टच्या माध्यमातून या दोन्ही लव्ह बर्ड्सना भंडावून सोडलं. अखेरीस सुष्मितानं स्वतः एक पोस्ट शेअर करत यावर स्पष्टीकरण दिलं. या स्पष्टीकरणात तिने वापरलेला हॅशटॅग #NOYB बद्दल अनेक प्रतिक्रिया तिच्या कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळाल्या. सुष्मिताने वापरलेल्या या हॅशटॅगचा अर्थ मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया असेच सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या शॉर्ट फॉर्म्स बद्दल...

शॉर्ट फॉर्म्स म्हणजे Acronyms किंवा अब्रेव्हेशन हे वेळ वाचवण्यासाठी चॅट मध्ये वापरले जातात. यातील काही कॉमन शब्द Plz, Sry, GN/GM, LOL हे सर्व आपणही ऐकले असतील पण असे काही शब्द आहेत ज्यांचे अर्थ पटकन लक्षात येत नाहीत अशा शब्दांची यादी इथे देत आहोत.

#NOYB – नन ऑफ युअर बिझनेस
#ROFL – रोलिंग ऑन द फ्लोअर लाफिंग
#IFYP – आय फील युअर पेन
#YOLO- यु ओन्ली लिव्ह वन्स
#SMH – शेकींग माय हेड
#NGL – नॉट गोइंग टू लाय (खोटं बोलणार नाही)
#NVM – नेव्हर माईंड
#IKR – आय नो राईट (मला माहितेय)
#IDK- आय डोन्ट नो (मला माहित नाही)
#IDC- आय डोन्ट केअर
#OFC – ऑफकोर्स
#IMO – इन माय ओपिनियन
#G2G- गॉट टू गो
#PAW – पॅरेन्ट्स आर वॉचिंग
#TIME – टिअर्स इन माय आईज

दरम्यान, मजेशीर गोष्ट म्हणजे, अनेकदा हे शॉर्ट फॉर्म्स जर चुकीच्या ठिकाणी वापरले जातात. उदाहरणार्थ जर का तुम्ही #YOLO हे सूचना म्हणून वापरलेत तर ते चुकीचं ठरेल कारण याचा अर्थ तुम्ही एकदाच जगायचंय आणि मज्जा करा असा होतो. असे काही फसलेले शॉर्ट फॉर्मचे प्रयोग आणि त्यावरून होणारी गंमत अनेकदा ऑनलाईन दिसून येते.