पेस्ट कंट्रोल करताय सावधान!लहान मुलांच्या जीवाला धोका..६ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू..

 ..त्यांनतर काहीच वेळात आहनाला डोकं दुखू लागलं आणि तिच्या अंगाला खाज येऊ लागली

Updated: Aug 4, 2022, 07:00 PM IST
पेस्ट कंट्रोल करताय सावधान!लहान मुलांच्या जीवाला धोका..६ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू..  title=

6 YEAR DIED BECAUSE OF PEST CONTROL:  आपल्या घरात झुरळ ढेकूण किंवा इतर कीटकांचा त्रास वाढू लागला कि आपल्याला पेस्ट कंट्रोल करण्याचा सल्ला दिला जातो ,म्हणजेच कीटक नाशक फवारणी करून घरी असलेल्या कीटकांचा नायनाट करण्याचा किंवा त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र हे पेस्ट कंट्रोल तुमच्या लहान मुलांच्या जीवावर उठू शकत .नुकतंच बंगलोर मध्ये ही घटना घडलेय कीटक नाशक फवारणी नंतर एका सहा वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. 

विनोद कुमार त्यांची पत्नी निशा आणि 6 वर्षांची मुलगी अहाना हे बंगलोर मध्ये भाड्याने राहत होते विनोद कुमार हे कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहेत दरम्यान हे कुटुंब २८ जुलै रोजी केरळला फिरण्यासाठी गेले मात्र जाण्याआधी घरमालकाला पेस्ट कंट्रोल करण्यास सांगून गेले त्याप्रमाणे घरमालकाने पेस्ट कंट्रोल करून घेतलं मात्र जेव्हा हे कुटुंब सुट्टीवरून परत आलं त्यांनतर काहीच वेळात आहनाला डोकं दुखू लागलं आणि तिच्या अंगाला खाज येऊ लागली तशी तक्रार तिने पालकांकडे केली .थोड्याच वेळात विनोद कुमार आणि त्यांच्या पत्नीलासुद्धा असाच त्रास होऊ लागला  आणि तिघांनाही उलट्या झाल्या त्यांनतर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान अहानाचा  मृत्यू झाला . 
मुलीच्या मृत्यूमुळे आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे ,आई अजून धक्क्यातून सावरलीदेखील नाहीये. संपूर्ण घटनेनंतर परिसरात मात्र हळहळ व्यक्त होतेय.दरम्यान पोलिसांनी घरमालकाला ताब्यात घेतलयं.आणि कलम 307 आणि कलम 304 A  अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय.