Viral Video : भारतात काय जगाच्या पाठीवर पण बिर्याणी प्रेमी आहेत. तुम्हाला पण बिर्याणी खायला आवडते ना. भारतात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वादिष्ट बिर्याणी खायची असेल तर तुम्ही Zomato किंवा Swiggy वरुन ऑर्डर करता. पण जर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या
परिसरातील रस्त्याना नदीचं स्वरुप प्राप्त झालं असेल तर मग काय करणार. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ पाहिला मिळतो आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. अशात दोन बिर्याणीची भांडी या साचलेल्या पाण्यातून वाहत जातं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बाजूला बिर्याणीचं खास हॉटेल आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स म्हणत आहेत की, ही तर 'बिर्याणी सेल्फ डिलिव्हरी' आहे. ज्या व्यक्तीने ही बिर्याणी ऑर्डर केली असेल तो हा व्हिडीओ पाहून तुफान वैतागला असेल. अगदी त्या व्यक्तीला आता पावसाळा कधी आवडणार नाही. हा झाला गंमतीचा भाग, तर हा व्हिडीओ हैदराबादचा असल्याचं बोलं जातं आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @IbnFaraybi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर या मजेशीर व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडतो आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने म्हटलं आहे की, ''फास्ट डिलिव्हरी करण्यासाठी निन्जा टेक्निक'' तर दुसरा यूजर म्हणतो की, ''पावसाने दम बिर्याणीला तेहरी बिर्याणी बनवलं आहे.'' तर एका यजूरने असं लिहिलं आहे की, ''ज्याने या बिर्याणीची ऑर्डर दिली असेल त्याला खूप वाईट वाटत असेल.''
Somebody is going to be unhappy for not getting his biryani order.#Hyderabad #HyderabadRains pic.twitter.com/OPdXsjSoKs
— Ibn Crowley (@IbnFaraybi) July 28, 2022