मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं मोठं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. शिवसेना हा एका कुटुंबाचा पक्ष आहे. तो लवकरच संपणार आहे, असं नड्डा म्हणाले. सगळ्याच प्रादेशिक पक्षावर त्यांनी हल्लाबोल केला.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा बिहारमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, असं मोठं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. शिवसेना हा एका कुटुंबाचा पक्ष आहे. तो लवकरच संपणार आहे.'
तर दुसरीकडे एक होती शिवसेना असं इतिहासात लिहिण्याची वेळ आली आहे. अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.