दंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडले

Updated: Jul 19, 2018, 12:42 PM IST
दंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार title=

रांची : छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बीजापूरच्या जवळच्या तिमेनारच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आत्तापर्यंत आठ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलंय. या आठपैंकी चार जण महिला असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडलेत.

जंगलादत अजूनही काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळतेय. दाट जंगल असल्याकारणानं नक्षलवाद्यांना लपण्याची संधू मिळतेय. नक्षलाद्यांची संख्या पाहता अतिरिक्त पोलीस दल रवाना करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, डीआरजी आणि एसटीएफनं संयुक्तरित्या ही कारवाई केलीय. दंतेवाडाचे एसपी कमललोचन कश्यप यांनी या बातमीला दुजोरा दिलाय.