पणजी : आरोग्याला हानिकारक फॉर्मेलिन रसायनाच्या वापरामुळे गोव्यात पुढचे १५ दिवस परराज्यातील मासे विक्रीवर बंदी आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मासळी विक्री व्यवसायावर गंभीर परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. मासळीचे भाव गगनाला भिडले आहे. व्यापारी सरकारला पाठिंबा देत असले, तरी मासळीच्या तपासणीची प्रक्रिया चुकीची असल्याचा दावा करत आहेत.
गोव्यातला सर्वात मोठा मासळी बाजार मडगावात आहे. झी २४चे प्रतिनिधी दिनेश दुखंडेंनी पहाटेच बाजार पेठ गाठली आणि तिथल्या स्थितीचा आढावा घेतला आहे.