नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा सातत्यानं वाढताना दिसत आहेत. सोमवारी मुंबईत पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर ३८ पैसे तर डिझेल ५२ पैशांची वाढ झालीय. आता मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी ७५.७७ रुपये मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी प्रतिलिटर ६७.१८ रुपये मोजावे लागतील. तर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा आजचा दर ७०.१३ रुपये प्रती लीटरवर पोहचलीय तर डिझेल ६४.१८ रुपये प्रती लीटरवर दाखल झालंय.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात २७ डिसेंबरपासून कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. पण आठवड्याच्या शेवटी ही दरवाढ थांबली असतानाही भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर त्याचा परिणाम कमी झालेला नाही.