गुलाब जामुनमध्ये ना 'गुलाब' आहे ना 'जामुन', मग याला असं नाव का पडलं? जाणून घ्या त्याची रंजक कहाणी

तुम्ही कधी असा विचार केलात का? त्याला गुलाब जामुन असे का म्हणतात?

Updated: Nov 28, 2021, 05:21 PM IST
गुलाब जामुनमध्ये ना 'गुलाब' आहे ना 'जामुन', मग याला असं नाव का पडलं? जाणून घ्या त्याची रंजक कहाणी title=

मुंबई : लुकमात-अल-कादी आणि गुलाब जामुन या अरब देशांमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या मिठाईंमध्ये बरंच साम्य आहेत. त्याची तयारी करण्याची पद्धत थोडी वेगळी असली तरी. इतिहासकार मायकेल क्रोंडल यांच्या मते, लुकमात-अल-कादी आणि गुलाब जामुन या दोन्ही पदार्थांची उत्पत्ती पर्शियन डिशमधून झाली आहे. दोघांचा संबंध साखरेच्या पाकाशी आहे. जेव्हा जेव्हा मिठाईचा उल्लेख येतो तेव्हा नक्कीच गुलाब जामुनची चर्चा होते. म्हणजे जर तुम्ही लोकांना विचारलात की, त्यांना गोड पदार्थामध्ये काय खायला आवडेल? तेव्हा बरेच लोकं गुलाब जामुन असे नाव घेतात.

परंतु तुम्ही कधी असा विचार केलात का? त्याला गुलाब जामुन असे का म्हणतात? या गोड पदार्थाला गुलाब-जामुन असे नाव देण्यामागचे नेमके कारण इतिहासात नोंदवले गेले आहे. इतिहास सांगतो, या गोडाचे नाव पर्शियाशी संबंधित आहे.

पर्शियन शब्दसंग्रहानुसार, गुलाब हा दोन शब्दांचा बनलेला आहे. पहिला 'गुल' म्हणजे फूल. दुसरा शब्द 'आब' म्हणजे पाणी. म्हणजेच गुलाबाच्या सुगंधाचे गोड पाणी. ज्याला आपण सामान्य भाषेत साखरेचे सरबत म्हणतो, त्याला तेव्हा तिथे गुलाब असे म्हणत. दुधापासून तयार केलेल्या खव्यापासून गोळ्या बनवल्या जात, ज्याचा रंग गडद होईपर्यंत तळला जात असे. ज्याची तुलना जामुनशी होते. त्यामुळे याला 'गुलाब जामुन' हे नाव पडले.

एक सिद्धांत सांगतो, गुलाब जामुन प्रथमच मध्ययुगात इराणमध्ये तयार करण्यात आला. ज्याला तुर्की लोकांनी नंतर भारतात आणले, अशा प्रकारे ते भारतात सुरू झाले.

तर दुसरा सिद्धांत म्हणतो, एकदा चुकून मुघल सम्राट शाहजहानच्या स्वयंपाक्याने तो तयार केला होता. ज्याला लोकांनी खूप पसंती दर्शवली. हळूहळू ते भारतातील प्रत्येक राज्यात प्रसिद्ध झाला आणि मिठाईचा एक महत्त्वाचा भाग बनला.

दुधाच्या खव्यापासून तयार होणारा हा गोड पदार्थ अनेक नावांनी ओळखला जातो. पश्चिम बंगालमध्ये याला पंटुंआ, गोलप जाम आणि कालो जाम असेही म्हणतात. मध्य प्रदेशातील जबलपूर गुलाब जामुनसाठीही प्रसिद्ध आहे. जबलपूर, कटंगी येथे एक जागा आहे, येथील सुरकुत्याचे रसगुल्ले प्रसिद्ध आहेत आणि ते आकारानेही खूप मोठे आहेत. चव आणि आकारामुळे इथे येणारा प्रत्येक माणूस याची चव नक्कीच घेतो.

गुलाब जामुनशी संबंधित आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याचे राजस्थानशी संबंध. गुलाब-जामुनची येथे भाजी केली जाते. येथे साखरेऐवजी मसाल्यांसोबत ड्रायफ्रूट्स आणि टोमॅटोचा वापर केला जातो. ही भाजी इथल्या स्थानिक जेवणाचा भाग आहे.