India's Defence Space Agency: चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचा आंतराळ क्षेत्रात दबदबा वाढला आहे. भारताने जागतिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच भारताचे आंतराळात स्वतंत्र स्पेस स्टेशन असणार आहे. यासह आंतराळात भारताची स्पेस आर्मी देखील कार्यरत होणार आहे. भारताची स्पेस आर्मी आंतरळात अमेरिका, चीनसह बरोबरी करणार आहे.
अंतराळ क्षेत्रात भारत आता आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. अंतराळात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी भारत स्पेस फोर्स तयार करणार आहे. भारतीय वायुसेनेने (IAF) यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. भारताची स्पेस आर्मी थेट चीनला टक्कर देणार आहे. हवाई दलाच्या माध्यमातून अंतराळातील नागरी आणि लष्करी पैलूंचे पूर्ण मूल्यांकन केले जात आहे. स्पेस आर्मी उभारण्यासाठी पायाभूत सुविधा आणि सैद्धांतिक आराखडाही तयार करण्यात आला आहे. वायू सेना स्पेस आर्मीच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे.
स्पेस आर्मीसाठी हवाई दलाच्या जवानांना खास ट्रेनिंग दिले जाणार आहे. यासाठी हैदराबादमध्ये स्पेस वॉर ट्रेनिंग कमांडचीही स्थापना करण्यात येणार आहे. या संस्थेअंतर्गत जवानांना अवकाश कायद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र महाविद्यालयेही उभारली जाणार आहेत. या महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अवकाश कायद्यात तरबेज असलेले व्यावसायिक दल तयार केले जाणार आहे.
शत्रूच्या प्रत्येक प्रत्येक बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दल आपल्या स्पेस आर्मीच्या माध्यमातून तब्बल 100 उपग्रह अवकाशात तैनात करणार आहे. इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकॉनिसन्स म्हणजेच ISR चे काम केले जाईल. हे सर्व उपग्रह केवळ लष्करी वापरासाठी असतील. तिन्ही लष्करांना या उपग्रहांचा फायदा होणार आहे. डिफेन्स स्पेस एजन्सीने (DSA) द्वारे यांचे निरिक्षण केले जाईल. जो स्पेस कमांडचा भाग आहे. या 100 उपग्रहांच्या माध्यमातून भारताची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. सध्या हवाई दलाकडे पूर्णपणे स्वयंचलित अॅड डिफेन्स नेटवर्क आहे. ज्याला इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम (IACCS) असे म्हणतात. इंटिग्रेटेड एअर स्पेस कमांड अँड कंट्रोल सिस्टम (IASCCS) म्हणून ओळखले जाईल. स्पेस आर्मच्या माध्यमातून IASCCS कंट्रोल केली जाणार आहे.
सध्या अेमरिका आणि चीन या दोन देशांच्या स्पेस आर्मी कार्यन्विकत आहेत. चीन स्पेस आर्मी उपग्रहाचा वापर जॅमर किंवा सायबरवेपन्स म्हणून करते. चिनी सैन्याचे नाव पीपल्स लिबरेशन आर्मी स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स (पीएलए-एसएसएफ) आहे. तर, अमेरिकेच्या स्पेस फोर्सचे नाव युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स (USSF) आहे. हे सैन्य अमेरिकेच्या सैन्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इस्रो आणि डीआरडीओच्या मदतीने भारत आपली स्पेस आर्मी उभारणार आहे. 100 उपग्रह अंतराळात तैनात केले जाणार आहेत. संवाद, हवामानाचा अंदाज, नेव्हिगेशन, रिअल टाइम ऑब्जर्व्हेशन यासाठी या उपग्रहांची मदत होणार आहे.