मुंबई : सोन्याला भारतीय समाजात मोठे महत्व आहे. लग्न समारंभ असो किंवा गुंतवणूक सोन्याची मागणी कायम असते. त्यामुळे सोन्याचे सध्याचे दर काय आहेत हे जाणून घेण्यास प्रत्येक जण इच्छुक असतो.
सोन्याचे दरांवर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामो़डींचा परिणाम होत असतो. तसेच सोन्याच्या मागणी पुरवठ्यामुळेदेखील सोन्याचे भाव कमी जास्त होत राहतात.
देशात कोरोनाच्या संसर्गामुळे अर्थिक व्यवहार मंदावले आहेत. शेअर बाजारही अस्थिर आहे. अशा परिस्थितीत MCX मध्ये गेल्या दोन-तीन दिवसात सोन्याचे दर घसरल्याचे चित्र आहे.
मुंबईतही सोन्याचे भाव 300 रुपये प्रतितोळ्यानुसार घसरले आहेत. तर चांदीचे दरही 1000 रुपये प्रति किलोने घसरले आहेत.
MCX मध्ये सोन्याचा दर दुपारी 12 वाजेपर्यंत 46700 प्रतितोळा नोंदवण्यात आला. तर चांदीचा दर 68397 प्रति किलो नोंदवण्यात आला
मुंबईतील सोन्याचा आजचा दर
22 कॅरेट 44170 प्रतितोळा
24 कॅरेट 45170 प्रतितोळा
मुंबईतील कालचे सोन्याचे दर (29एप्रिल)
22 कॅरेट 44,480 प्रतितोळे
24 कॅरेट 45,480 प्रतितोळे
मुंबईतील चांदीचा दर
आज 67,500 प्रतिकिलो
काल 68,600 प्रतिकिलो
सोने आणि चांदी दोघांमध्ये झालेल्या घसरणीचा गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांना फायदा होऊ शकतो.
-----------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)