Shocking Crime News: बिहारमधील भागलपूरमध्ये विवाहित महिलेच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असून यामध्ये त्याला त्याच्या प्रेयसीने मदत केली. मात्र ज्या क्रूरपणे या महिलेची तिच्या पतीने हत्या केली ते पाहून पोलिसांच्या अंगावरही काटा आला. पतीने आधी पत्नीला अॅसिड पाजलं आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो कोसी नदीमध्ये फेकून दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये आरोपीला मदत करणारी त्याची प्रेयसी ती आरोपीची मामी आहे.
हा प्रकार नवगछियामधील रंगरा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील जहांगीपूर बैसी येथे घडला आहे. येथे राहाणाऱ्या फैयाजने 2 वर्षांपूर्वी शबनम खातूनशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांमध्येच शबनमला शंका आली की तिच्या पतीचं त्याची मामी रीना खातूनबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. मागील दोन वर्षांपासून शबनम या दोघांच्या नात्याला विरोध करत होती. यावरुन अनेकदा दोघांचा वाद व्हायचा. या दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर मागील वर्षभरापासून फैयाज आणि त्याच्या मामीने शबनमला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीला घरी नांदवण्यासाठी फैयाज एक लाख रुपये मागायचा असा आरोप आहे.
शबनमच्या नातेवाईकांना दिलेल्या माहितीनुसार, अचानक शबनमच्या सासरवाडीवरुन आलेल्या एका फोनमुळे आमच्या पायाखालची जमीनच सरकली. 4 ऑगस्ट रोजी शबनमची आई शामीना यांना फैयाज आणि रीना या दोघांनी मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शबनमच्या नातेवाईकांनी रंगडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फैयाज आणि रीनाविरुद्ध तक्रार दाखल केली. नवगछियामधील पोलीस अधिकारी ओम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत फैयाज आणि रीनाला अटक केली.
नक्की वाचा >> S*x साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे; कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं, 'दोघांमधील...'
अटक करण्यात आल्यानंतर फैयाज आणि रीनाने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फैयाज आणि त्याची प्रेयसी असलेली त्याची मामी रीना या दोघांनी मिळून शबनमची हत्या केली. या दोघांनी शबनमला अॅसिड पाजलं. त्यानंतर तिचा गळा दाबून तिला संपवलं. आरोपींनी शबनमचा मृतदेह कोसी नदीत टाकल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी फैयाजच्या घरातून अॅसिडची बाटली जप्त केली असून दोघांना सध्या तपास सुरु असेलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जाणार आहे.