Womens Fight In Metro : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. पण अहो मेट्रोमध्ये...हो मेट्रोमध्येही महिलांनी कुस्तीचा आखाडा तयार केला आहे. लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो यातून असंख्य लोक प्रवास करत असतात. सोशल मीडियावर मुंबई लोकल आणि दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
दिल्ली मेट्रो (Delhi Viral Video) तर अश्लील व्हिडीओमुळे ओळखली जाते आहे. बिकिनी घालून तरुणीचा प्रवासानंतर दिल्ली मेट्रोतील अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर आले. प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे, त्यानंतर तरुणाचं हस्तमैथून आणि एक तर दोन मुलांचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओने दिल्ली मेट्रो आणि दिल्ली महिला आयोगाची झोप उडवली होती.
आता पुन्हा दिल्ली मेट्रोमधील एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आली आहे. या व्हिडीओमध्ये (Delhi Metro Fight) दोन महिलांनी मेट्रोमध्ये कुस्तीचा आखाडा बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. गुगलवर सोशल मीडियावर आजचा सर्वाधिक व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटल्यावर हा व्हिडीओ समोर येत आहे. (After Mumbai Local delhi metro two girls bottle and sandal fight video viral on Social media trending news google )
शिकलेल्या आणि चांगल्या घरातील दोन बायकांमधील हे भांडण पाहून नेटकरी हैराण झाले आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता लाल रंगाचा टॉप घातलेली तरुणी दुसऱ्या महिलेला चप्पल दाखवून अपशब्द वापर आहे. मग समोरची महिला कशी चूप राहणार तिही त्या तरुणीला शिवीगाळ करते. काही महिलांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे. मात्र त्या दोघांमधील वाद युद्ध भूमीत बदलं.
एकीच्या हातात चप्पल तर दुसरीच्या हातात पाण्याची बॉटल होती. अखेर जिच्या हातात पाण्याची बॉटल होती तिने त्याचं झाकण उघडलं आणि त्या तरुणीच्या अंगावर पाणी ओतायला लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडीओ सध्या चर्चा विषय बनला आहे.
Delhi Metro has become a battleground pic.twitter.com/uWVge6sl68
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) June 4, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरवर Deepika Narayan Bhardwaj या अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''दिल्ली मेट्रो आता युद्ध भूमी बनली आहे.''