पाठदुखीने हैराण आहात? हे घरगुती उपाय वापरून पाहा

पाठदुखीच्या त्रासाचा समावेश हा आजारांच्या यादीत पहिल्या 12 क्रमांकावर आहे.

Updated: Mar 31, 2022, 03:01 PM IST
पाठदुखीने हैराण आहात? हे घरगुती उपाय वापरून पाहा title=

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये आरोग्याच्या समस्यांचाही समावेश असतो. यातील एक तक्रार म्हणजे पाठदुखी.  पाठदुखीचा त्रास सध्या इतका सर्वसामान्य झाला आहे की लोकं त्याकडे दुर्लक्ष करू लागलेत. मात्र असं करणं पाठीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे का? 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे, पाठदुखीच्या त्रासाचा समावेश हा आजारांच्या यादीत पहिल्या 12 क्रमांकावर आहे. 

जर सातत्याने पाठदुखीकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने मोठी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आज जाणून घेऊया की पाठदुखीच्या त्रासाची समस्या कशी दूर करावी.

नियमित योगाभ्यास करा

पाठीच्या दुखण्यावर काही योगासनं प्रभावी ठरतात. यामध्ये त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन, पवनमुक्तासन ही योगासनं केल्याने त्रास कमी होण्यास मदत होते. मात्र ही योगासनं नियमित करणं फार गरजेचं आहे.

आहारात कॅल्शियचा समावेश

हाडं ठिसूळ होणं हे पाठदुखीचं प्रमुख कारणं मानलं जातं. अशावेळी हाडांच्या मजबूतीसाठी आहारात कॅल्शियमचा समावेश करावा. साजूक तूप, दूध, उडीद, मासे या पदार्थांचा समावेश आहारात करणं गरजेचं आहे.

अंघोळीच्या पाण्यात मीठ घाला

पाठदुखीच्या समस्येत स्नायूंची भूमिका ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे स्नायू रिलॅक्स करण्यासाठी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात मीठ घालावं. आणि त्या पाण्याने अंघोळ करावी.