नशामुक्तीसाठी 'असा' करा मनुक्याचा आहारात समावेश

बेदाणे किंवा मनुकांचा वापर अनेकजण केवळ गोडाच्या पदार्थांपुरते मर्यादीत ठेवतात. 

Updated: Aug 12, 2018, 02:52 PM IST
नशामुक्तीसाठी 'असा' करा मनुक्याचा आहारात समावेश  title=

मुंबई : बेदाणे किंवा मनुकांचा वापर अनेकजण केवळ गोडाच्या पदार्थांपुरते मर्यादीत ठेवतात. परंतू केवळ गोडाच्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीही बेदाणे फायदेशीर आहे. बेदण्यांमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने प्रामुख्याने कमजोरी कमी करण्यासाठी, तात्काळ उर्जा देण्यासाठी बेदाणे मदत करतात. मात्र याव्यतिरिक्त व्यसनातून मुक्तता मिळवण्यासाठीदेखील मनुका खाणं मदत करते. 

मनुकांचा आरोग्यदायी पद्धतीने कसा कराल उपयोग ? 

गुटखा, पानमसाला अशा पदार्थांचे सेवन करणं आरोग्याला त्रासदायक ठरते. यासोबतच मदयपान, धुम्रपान याचं व्यसन जडलं की त्याचा थेट शारीरिक, मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. व्यसनातून अनेक दुर्धर आजारांचा धोका बळावतो. सोबतच नाहक या व्यसनाचा परिणाम तुमच्या आजुबाजूच्या लोकांवरही होण्याची शक्यता असते.  

घरगुती उपाय 

मनुक्याचे काही दाणे, काळामिरी पूड, वेलची, दालचिनी यांचे एकत्र मिश्रण करा. हे मिश्रण तुम्ही एकत्र मिक्सरमध्ये वाटा. 

या मिश्रणाचे लहान लहान गोळे करा. ही लहानशी गोळी चघळत रहा. यामुळे नशा कमी होण्यास मदत होते. व्यसनांपासून सुटका होते. 

या गोळीमुळे व्यसनांमुळे, नशेमुळे शरीरात येणार्‍या कमजोरीचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

मनुका शरीराची पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते.