High Blood Pressure Control Tips: आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे ( Wrong Lifestyle ) अनेक आरोग्याच्या समस्य मागे लागतात. यापैकी एक समस्या म्हणजे, उच्च रक्तदाब ( High blood pressure ). सध्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला उच्चदाबाचा ( High blood pressure ) त्रास होताना दिसतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी अनेकांचा कल हा औषधांकडे वळतो. मात्र आज आम्ही तुम्हाला औषधांसोबत ( Medicine ) उच्च रक्तदाब कसा नियंत्रणात आणायचा याबाबत माहिती देणार आहोत.
बैठ्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला व्याया करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र व्यायामामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. व्यायाम केवळ लठ्ठपणा कमी करण्यास मदत करत शकत नाही तर रक्तात असणारी हाय ब्लड शुगर तसंच उच्च रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
डॉक्टरांनी शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्तदाबाची पातळी असणं म्हणजे उच्च रक्तदाब होय. आनुवंशिकता, बैठी जीवनशैली, जंक फूड आणि प्रक्रिया केलेलं पदार्थांचं सेवन, लठ्ठपणा, तणाव ,धूम्रपान तसंच अल्कोहोलचं सेवन उच्च रक्तदाबास ( High blood pressure ) कारणीभूत ठरत असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलंय.
नवी मुंबईतील कार्डियोलॉजीस्ट डॉ. अनुज अनिरुद्ध साठे यांच्या माहितीनुसार, "नियमित व्यायामामुळे हृदय मजबूत होण्यास मदत होते. मजबूत हृदय असण्याने कोणतेही प्रयत्न न करता कार्यक्षमतेने रक्त पंप करणं शक्य होते. परिणामी, रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होऊन रक्तदाब कमी करतं. यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण देखील कमी करण्यास मदत होते. उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर आणि किडनीच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे नियमितपणे औषधं घेणं आणि व्यायाम करणं आवश्यक आहे."
उच्च रक्तदाबास सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता कमी करू शकतो. हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींनी जिमिंग, सायकलिंग, वेगाने चालणं, पोहणं, योगा करणं, एरोबिक्स यांसारखे व्यायाम केले पाहिजेत. दिवसातून किमान 5 वेळा 30 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला हायपरटेन्शन आणि इतर कोणतीही कोमॅार्बिडीटी असेल तरच फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा, असंही डॉ. साठे यांनी सांगितलंय.
रक्तवाहिन्यांमध्ये 140/90 mmHg किंवा त्याहून अधिक दाब असणं म्हणजेच उच्च रक्तदाब. त्यामुळे जर तुम्हाला यापेक्षा जास्त प्रमाण दिसलं तर पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.