Champions Trophy 2025 : पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच संपूर्ण शेड्युल आयसीसीने अजून जाहीर केलेलं नाही मात्र त्याआधीच इंग्लंडच्या संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्यांचा संघ जाहीर केला आहे. यात अनेक दिग्गज खेळाडूंसह काही नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली असून संघाचं नेतृत्व जोश बटलरकडे सोपवण्यात आलं आहे.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने 16 खेळाडूंच्या वनडे संघाची घोषणा केली असून हाच संघ पुढील वर्षी भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये खेळले तर हाच संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा खेळेल. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या संघात इंग्लडच्या टेस्ट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याला संधी देण्यात आलेली नाही.
इंग्लंडचा स्टार क्रिकेटर जो रूट हा जवळपास एक वर्षानंतर इंग्लंडच्या वनडे संघात परत आला आहे. जो 2023 रोजी भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये इंग्लंडच्या संघाचा भाग होता. बेन स्टोक्सबद्दल बोलायचं झाल्यास काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीज दरम्यान त्याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या इंग्लंडच्या संघातून वगळण्यात आलेले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद यंदा पाकिस्तानमध्ये होणार असून भारतीय संघासाठी ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाईल. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यासाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार असून टीम इंडियाचे सामने हे वेगळ्या देशात खेळवले जातील. सूत्रांच्या माहितीनुसार भारताचे सामने हे दुबईत खेळवले जाऊ शकतात.
हेही वाचा : चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी
Breaking squad news Our squads to tour India and for the Champions Trophy Click below for the details
England Cricket (englandcricket) December 22, 2024
जोश बटलर (कर्णधार), जो रूट, जोफ्रा आर्चर, गस एट्किंसन, जॅकब बॅथेल, हॅरी ब्रूक, ब्राइडन कार्स, बेन डकेट, जेमि ओवर्टन, जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल साल्ट आणि मार्क वुड.