मुंबईत SUV ने 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडलं; 19 वर्षीय ड्रायव्हर जेव्हा कार...

Mumbai Accident News : मुंबईत धक्कादायक अपघाताने सर्वांना धक्का बसलाय. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत एका चार वर्षांच्या मुलाला चिरडलं. या अपघातात त्या निष्पाप जीवाचा बळी गेलाय. 

नेहा चौधरी | Updated: Dec 22, 2024, 04:45 PM IST
मुंबईत SUV ने 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडलं; 19 वर्षीय ड्रायव्हर जेव्हा कार... title=

Mumbai Accident News : कुर्ल्यामधील एक बेस्ट बस अपघातात निष्पाप जीवांना मुकावं लागलंय. ही दुर्घटना ताजी असताना मुंबईत धक्कादायक अपघात झालाय. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी वडाळा इथे एका भरधाव कारने एका 4 वर्षाच्या मुलाला चिरडलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला असून 4 वर्षीय आयुष किनवडे याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी सांगितलंय की, पीडितेचे कुटुंब फूटपाथवर राहते आणि त्याचं वडील मजूर आहेत. 

हा अपघात अल्पवयीन 19 वर्षाच्या तरुणाने हा अपघात केलाय. हुंडाई क्रेटा चालवणारा आरोपी संदीप गोळे असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांने त्याला अटक केलीय. संदीप गोळे हा विलेपार्लेमध्ये राहतो. गोळे हा तरुण त्याची कार रिव्हर्स घेत असताना यावेळी रस्त्यावर खेळत असणाऱ्या आयुषला आरोपीने चिरडलं. या अपघातात आयुषला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्या तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. 

दरम्यान अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता का ? याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. तसंच घटनास्थळाची परिस्थिती समजण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही देखील तपासत आहेत. तसंच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नुकत्याच रस्ते अपघाताचा अहवाल समोर आलाय. महाराष्ट्रात रस्ते अपघाताची संख्या वाढतेय. 2018 ते 2022 या कालावधीत राज्यामध्ये 66,370 रस्ते अपघात बळी ठरलंय. या अहवालानुसार सर्वाधिक रस्ते अपघात उत्तर प्रदेश, त्यानंतर तामिळनाडू आणि तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं की, दरवर्षी रस्ते अपघातात 1,78,000 जीव गमावले जातात. त्यांच्यातील 60 टक्के बळी हे 18 ते 34 वयोगटातील असतात. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात या रस्ते अपघातांना आळा बसवता यावा, यासाठी नियम करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून केली आहे.