Food Avoid In Summer : उन्हाळ्यात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...

Health in Summer : तुम्हाला अगदी सोप्या वाटणाऱ्या काही गोष्टी आपण या उन्हाळ्यात पाळल्यास आपल्या हे टाळता येणार नाही. जर तुम्हाला उष्माघाताचा त्रास कमी करायचा असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

श्वेता चव्हाण | Updated: May 15, 2023, 02:53 PM IST
Food Avoid In Summer : उन्हाळ्यात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा... title=
Unhealthy Food for Health in Summer

Unhealthy Food for Health in Summer : दिवसेंदिवस तापमानाचा (temperature) पारा झपाट्याने वाढत आहे. हा पारा असंच सुरु राहिल्यास गंभीर परिस्थिती व समस्यांना सामोरे जावे लागेल. आपल्याला माहिती आहे की, दरवर्षी आपल्याला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो. मात्र यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण अतिउष्णता (overheating) असल्यामुळे राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. बाहेर जाताना स्वतःची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवनशैलीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

तसेच वृद्ध, मधुमेह, किडनी, अर्धांगवायू, हृदयविकाराच्या रुग्णांनी या दिवसात विशेष काळजी घ्यावी. तापमान वाढल्याने शरीरातील पाणी कमी झाल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला लक्षणे अगदी सोपी असतात, जर तुम्ही ती वेळीच ओळखली नाहीत तर ती गंभीर स्वरूप धारण करू शकतात. वाढत्या उष्मघातामुळे डिहायड्रेशनसोबतच पोटात गॅस , उलट्या आणि जुलाब यासारख्या पोटाच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ खाऊ नयेत ते जाणून घ्या... 

मसालेदार अन्नपदार्थ (Spicy food)

मसालेदार अन्न खाणे खूप चवदार वाटते, पण हेच मसालेदार पदार्थ आरोग्यास हानी पोहोचवू शकते. जास्त तेल आणि मसालेदार अन्नामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढण्यासोबत अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, याशिवाय चरबीच्या ऊतींमध्ये जमा होऊन पोटाची चरबी वाढवण्यास मदत करतात. 

सुकामेवा (dried fruit)

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाणे टाळावे. सुक्या मेव्याच्या अतिसेवनामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. वास्तविक, कोरड्या फळांमध्ये पाणी कमी आणि साखर जास्त असते. या उच्च शर्करा शरीरातील उष्णता वाढवण्याचे काम करते.

मीठ (salt)

हिवाळा असो वा उन्हाळा कोणत्याही ऋतूत जास्त प्रमाणात मिठाचे अतिसेवन शरीरिसाठी घातक ठरु शकते. मीठ ज्याला सोडियम क्लोराईड असेही म्हणतात, त्याचे अतिसेवनमुळे शरीरात जळजळ, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासह इतर अनेक आजारांना कारणीभूत ठरते. याशिवाय उन्हाळ्यात मिठाचे जास्त सेवन केल्याने शरीरात डिहायड्रेशन होते.

मांसाहारी (non-vegetarian)

ज्यांना मांसाहार आवडतो त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात रोजचे सेवन करणे टाळावे. लाल मांस, मटण इत्यादी पदार्थ शरीरात अधिक उष्णता निर्माण करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ वाढवतात. ज्यामुळे पोट आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

गरम मसाला (garam masala)

हिवाळ्यात भाज्यांमध्ये घातलेले गरम मसाले तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. परंतु उन्हाळ्यात यापैकी जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. याच्या अतिसेवनाने शरीरातील उष्णता वाढण्यासोबत हात-पायांमध्ये जळजळ होऊ शकते. 

फास्ट फूड (Fast food)

पिझ्झा, बर्गर हे फास्ट फूड आहे. त्यात खूप जास्त चरबी, सोडियम आणि खूप कॅलरीज असतात. यामुळे हृदयविकार आणि लठ्ठपणाचा धोका अनेक पटींनी वाढतो. याशिवाय आरोग्याच्या अनेक समस्या आहेत.

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)