मुंबई : आजाकाल तणावग्रस्त होत चाललेल्या जीवनशैलीमुळे लाईफ़स्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे. यापैकी एक म्हणजे मधुमेह. मधुमेहाच्या रूग्णांना आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहावर पूर्णपणे मात करणं कठीण असले तरीही काही उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
मधुमेहींसाठी शेपूची भाजी अत्यंत फायदेशीर आहे. शेपूच्या भाजीच्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत होते. शेपूची भाजी ही ओव्याच्या प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे मधुमेहींसोबतच इतर काही आजारांनाही आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास दूर ठेवण्यासाठी शेपू मदत करते.
वातावरणातील बदलांमुळे असेल किंवा चूकीच्या आहार पद्धतीमुळे पोटात गॅस होऊ शकतो. शेपूच्या भाजीमुळे वरंवार होणारा हा गॅसचा त्रास नैसर्गिकरित्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
शेपूच्या भाजीमुळे तोंडाचं आरोग्य जपण्यासाठीदेखील मदत होते. यामधील अॅन्टिऑक्सिडंट घटक हिरड्यांचं आरोग्य जपते. सोबतच इंफेक्शनचा धोका कमी करण्यासही मदत होते.
शेपूच्या भाजीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. शरीरात वाढणार्या बॅक्टेरिया, व्हायरसचा धोका कमी होण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास शेपूची भाजी मदत करते.
शेपूच्या भाजीमध्ये आढळणारे नैसर्गिक स्वरूपातील तेल श्वसन संस्थेचं आरोग्य सुधारायला मदत करतात.