सांधेदुखी असल्यास आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा!

सांधेदुखी/अर्थरायटिस ही आजकालची सामान्स समस्या उतारवयात अनेकांना त्रासदायक ठरते.

Updated: Mar 22, 2021, 10:12 PM IST
सांधेदुखी असल्यास आहारात या ४ पदार्थांचा समावेश करा! title=

मुंबई : सांधेदुखी/अर्थरायटिस ही आजकालची सामान्स समस्या उतारवयात अनेकांना त्रासदायक ठरते. पूर्वी उतारवयात जाणवणाऱ्या या समस्येने सध्या तरुणाईही त्रासली आहे. तुम्ही देखील या समस्येला सामोरे जात असाल तर आहारात या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

लसूण

दैनंदिन आहारात लसणाचा अवश्य समावेश करा. याच्या सेवनाने अर्थरायटिस रुग्णांना फायदा होतो. यात असलेल्या अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल, अॅंटी बायोटिक आणि अॅंटी इंफ्लेमेट्री गुणधर्मांमुळे सांधेदुखीवर आराम मिळण्यास मदत होते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात लसणाच्या २ हुन अधिक पाकळ्या खावू नका. कारण लसूणही गरम असतो.

ब्रोकोली

पोषकघटकांनी परिपूर्ण अशी ब्रोकोली सांधेदुखीवर अतिशय फायदेशीर ठरते. यात कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, आयर्न, व्हिटॉमिन ए-सी, क्रोमियम असते. त्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. 

हळद

हळदीत करक्यूमिन नावाचे तत्त्व असते. त्यामुळे आजार पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर सांधेदुखीवरही अत्यंत प्रभावी ठरते. 

ओमेगा ३ अॅसिड

अर्थरायटिसपासून सुटका मिळवण्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे सेवन करा. यासाठी आहारत मासे, फिश ऑईल याचा समावेश करा.

ही काळजी घ्या

  • फिरणे बंद करु नका.
  • नियमित व्यायाम करा.
  • फास्ट फूड आणि डबाबंद पदार्थांचे सेवन टाळा. 
  • फॅट्सयुक्त पदार्थ खाणे टाळा.