हाड तुटल्यास या '6' गोष्टींची तात्काळ मदत करा !

Updated: Jun 5, 2018, 08:27 AM IST
हाड तुटल्यास या '6' गोष्टींची तात्काळ मदत करा !  title=

मुंबई : बेसावध असताना धडपडल्यास किंवा अपघातामध्ये जोरदार इजा झाल्यास शरीरात फ्रॅक्चर होण्याची भीती असते. हाड तुटल्यानंतर होणारा त्रास असहनीय असल्याने सूज, वेदना, शरीरावर काळे, नीळे डाग पडणे अशा समस्या हमखास उद्भवू शकतात. म्हणूनच तुमच्या जवळपास एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारची गंभीर इजा झाल्यास मदत  करताना या गोष्टीचं भान ठेवा. 

रूग्णवाहिकेची मदत - 

एखादी व्यक्ती अपघातानंतर बेशुद्ध होऊन पडली असल्यास त्याला मदत करा. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तात्काळ रूग्णवाहिकेची मदत घ्या. श्वास बंद, नाडी तपासून पहा. जर श्वास घेणं बंद झाले असेल तर तात्काळ सीपीआर द्या. 

रक्त थांबवा - 

फ्रॅक्चर झाल्यानंतर रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. अशावेळेस रक्त थांबवण्यासाठी स्वच्छ कपड्याने जखमेवर बांधा.  

घाबरणं -

अचानक हिसका बसल्यानंतर श्वास घेताना होणारा त्रास, कमजोरी, चक्कर येणं, श्वास घेताना त्रास होणं, रक्त अतिप्रमाणात वाहणं असा त्रास होऊ शकतो. अशावेळेस रूग्णाचे पाय थोडेवर करून त्यांना आरामदायी स्थितीत बसवा / झोपवा. थंड वाटत असल्यास त्यांना चादरीमध्ये किंवा एखाद्या उबदार वस्त्रामध्ये गुंडाळा.  

तुटलेल्या भागाला स्थिर करण्याचा प्रयत्न 

एखाद्या भागात फ्रॅक्चर असल्याचा अंदाज आल्यानंतर शक्यतो तो त्या भागात हालचाल कारणं टाळा. पाठीमध्ये किंवा मानेमध्ये फ्रॅक्चर असल्यास हा प्रकार जीवघेणा ठरू शकतो. तुमच्या जवळ असलेल्या कपड्याने, कागदाने त्या भागाला आधार देण्याचा प्रयत्न करा. 

थंड पट्टी 

ज्या भागावर त्रास जाणवत असेल तेथे थंड पाण्याची पट्टी ठेवा. आईस पॅकने सूज कमी होण्यास मदत होईल. फ्रॅक्चर झालेल्या जगेवर थेट बर्फ लावणं टाळा. एखाद्या कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून त्या भागावर लावा. 

पेनकिलर 

फ्रॅक्चरनंतर पेनकिलरची मदत घ्या. मात्र पेनकिलरमुळे रक्त अधिक पातळ होऊन वाहू शकते. यासाठी आईब्रुफेन, लेनोल वयोवृद्धांसाठी फायदेशीर आहे. लहान मुलांसाठी लेनोल अधिक मदत करते.