सावधान! तुमच्या किचनमधील एअर फ्रायर कॅन्सरचा एजंट?

Air fryer Causes Cancer:  एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Pravin Dabholkar | Updated: Jan 20, 2025, 09:54 PM IST
सावधान! तुमच्या किचनमधील एअर फ्रायर कॅन्सरचा एजंट? title=
एअर फ्रायर

Air fryer Causes Cancer: तुम्ही तुमच्या किचनमध्ये एअर फ्रायर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.. एअर फ्रायर वापरल्याने आपला स्वयंपाक करण्यासाठी  लागणाऱ्या वेळेत नक्कीच बचत होते. मात्र हा एअर फ्रायर आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

अलिकच्या काळात माणसांच्या हातात जसा स्मार्ट फोन आलाय. तशीच घरातील किचन सुद्धा स्मार्ट झाल्याचं पाहायला मिळतंय.. मिक्स ग्राईंडर, इलेक्ट्रीक किटली, कॉफि मेकर, ओव्हन, मायक्रोवेव आणि एअर फ्रायर अशा अनेक अॅडव्हान्स वस्तू आपण किचनमध्ये वापरतो.. अलिकडे एअर फ्रायर तर प्रत्येकाच्या किचनमध्ये पाहायला मिळतो. एअर फ्रायरमुळे वेळेचे बचत होते.. मात्र तुमच्या घरात तुम्ही वापरत असलेला एअर फ्रायर कॅन्सला निमंत्रण ठरू शकतो हे सांगितलं तर तुम्हाला धक्काच बसेल. हो हे खरंय. एअऱ फ्रायरमध्ये शिजवलेलं अन्न खाल्ल्याने कॅन्सरचा धोक्या बळावण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

एअर फ्रायरमध्ये उच्च तापमानावर जेवण शिजवलं जातं. उच्च तापमानामुळे कार्सिनोजेनिक घटक अन्न पदार्थामध्ये वाढू शकतात. कार्सिनोजेनिकचं वाढतं प्रमाण कॅन्सरचं कारण ठरू शकतं. त्यासोबत एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्यामुळे त्यातील पोषकतत्त्व कमी होतात. 

एअर फ्रायरमुळे पोषकतत्त्व कमी

एअर फ्रायरमध्ये उच्च तापमानावर जेवण शिजवलं जातं. उच्च तापमानामुळे अन्न पदार्थांमधील पोषकतत्त्व कमी होऊ शकतात. खासकरून पाण्यात विरघळणाऱ्या अन्न पदार्थांमधील पोषणतत्त्व पूर्णपणे नष्ट होण्याची भीती असते. एअर फ्रायरमध्ये शिजवलेलं अन्न खाल्यानं कॅलरीजचं प्रमाण वाढू शकतं. कॅलरीज वाढल्यानं तुम्हाला लठ्ठपणाही होऊ शकतो. शरीरातील आरोग्याला हानिकारक फॅट वाढू शकतात. एअर फ्रायरमध्ये नियमित जेवण बनवल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचाही धोकाही असतो.

प्रत्येक वस्तूचे काही फायदे तर काही तोटेही आहेत.. मात्र या मध्ये समतोल साधणंही तितकंच महत्वाचं आहे. कोणतीही स्मार्ट हायचेक वस्तू वापरण्याआधी त्यांच्या फायद्यासह तोट्याचाही नक्कीच विचार करा.. तुम्ही रोजचं जेवण बवनत असताना एअऱ फ्रायरचा वापर 5 टकक्यांपेक्षा अधिक असायला नको असं जाणकारांचं म्हणणं आहे.. याची काळजी घ्या आणि  तुम्ही आणि तुमचं कुटुंब राहा फिट अॅन्ड फाईन.