सनी लिओनीने घरातच शूट केला व्हिडीओ, पती डॅनियलला दृश्य पाहून धक्का

  देशात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणखी २ आठवड्यांसाठी वाढवला गेला आहे. 

Updated: May 4, 2020, 11:09 PM IST
 सनी लिओनीने घरातच शूट केला व्हिडीओ, पती डॅनियलला दृश्य पाहून धक्का title=

मुंबई :  देशात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणखी २ आठवड्यांसाठी वाढवला गेला आहे. लोकांनी घरातच राहण्याची सवय केली आहे. बॉलीवूडची अभिनेत्री सनी लिओनी लॉकडाऊन काळात घरातच आहे. सनी आपल्या चाहत्यांचं व्हिडीओ बनवून मनोरंजन करीत आहे. 

सनी सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती मुलांची काळजीही घेते.

सनी लिओनीनी आपल्या पतीसोबत एक प्रँक देखील केलं आहे, तिने आपला पती डॅनियल वीबरला चांगलंच घाबरवलं आहे.

सनी लिओनीन हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. व्हिडीओत सनी किचनमध्ये काम करीत आहे, आणि तिचं बोट अचानक कापलं गेलं आहे, एवढं की ते तुटलंय. 

 
 
 
ती ओरडते आणि डॅनियलला आवाज देते, डॅनियल खूपच घाबरतो, रक्त पुसण्यासाठी तो नॅपकीन शोधतो, आणि शेवटी डॅनियलला रक्तासारखा रंग पुसल्यावर समजतं की, हे नाटक आहे.