जाता जाता दिव्या भारतीचा ब्लॉकबस्टर सिनेमा मिळाला श्रीदेवीला

पाहा कोणता आहे हा सिनेमा 

जाता जाता दिव्या भारतीचा ब्लॉकबस्टर सिनेमा मिळाला श्रीदेवीला title=

मुंबई :  श्रीदेवीच्या निधनानंतर आज तिचा पहिला वाढदिवस. श्रीदेवीने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तम सिनेमा दिले आहेत. बॉलिवूडमध्ये एक वेळ अशी होती जेव्हा श्रीदेवी आणि दिव्या भारतीची तुलना होत होती. या दोघींच्या चेहऱ्यात तर साधर्म्य होतंच पण त्यांच आणखी एक कनेक्शन समोर आलं आहे. दिव्या भारतीचा जन्मदिवस 25 फेब्रुवारी आणि श्रीदेवीचा मृत्यू 24 फेब्रुवारी रोजी झाला होता. 

दिव्या भारतीने हिंदी सिनेमात 'विश्वात्मा' मधून डेब्यू केलं आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर दिव्या भारती श्रीदेवीची जागा घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र 19 वर्षाच्या दिव्या भारतीचा आकस्मित मृत्यू झाला. तिच्या अशा जाण्याने प्रत्येकालाच धक्का बसला. दिव्या भारती आणि श्रीदेवीचा चेहरा इतका मिळता जुळता होता की, दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर एका सिनेमात तिच्या जागी श्रीदेवीला घेण्यात आलं. 1994 मध्ये 'लाडला' या सिनेमात दिव्या भारतीला घेण्यात आलं त्यानंतर सिनेमाचा काही भाग शूट झाल्यानंतर दिव्या भारतीच अचानक निधन झालं. त्यानंतर सिनेमाचं चित्रिकरण थांबवण्यात आलं. फिल्म मेकर्सने दिव्या भारतीच्या जाण्यानंतर श्रीदेवीशी संपर्क साधला आणि तिला 'लाडला' या सिनेमाकरता घेतला. दिव्या भारतीसोबत शूट केलेला एक व्हिडिओ यूट्यूबवर आहे. 

श्रीदेवीसोबतच या सिनेमात रवीना टंडन देखील होती. 6 महिन्यानंतर जेव्हा या सिनेमाच शुटिंग सुरू झाली तेव्हा सेटवर वेगवेगळी चर्चा रंगली. एका सीनमध्ये श्रीदेवीसोबत शक्ती कपूर आणि रवीना टंडन होते. श्रीदेवी एका ठिकाणी सारखी अडखळत होती त्याच ठिकाणी दिव्या भारती देखील अडखळत असल्याचं सगळ्यांना आठवलं. रवीना टंडन आणि शक्ती कपूर हे बघून घाबरले.