राखी सावंत म्हणाली- मला आर्यन, अबरामसारखा मुलगा हवा; शाहरुख खान माझी मदत करू शकतो!

 अभिनेत्री राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटलं जातं. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त कोणाची होत असेल तर ती राखी सावंतची. 

Updated: Nov 23, 2023, 01:41 PM IST
राखी सावंत म्हणाली- मला आर्यन, अबरामसारखा मुलगा हवा; शाहरुख खान माझी मदत करू शकतो! title=

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटलं जातं. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त कोणाची होत असेल तर ती राखी सावंतची. कधी ती तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते तर कधी तिचा एक्स पती आदिल दुर्रानीमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नेहमी चर्चेत असणारी राखी सावंत यावेळी शाहरुख खानमुळे चर्चेत आली आहे. नुकतीच राखीने शाहरुखकडे विचीत्र मागणी केली आहे. जे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

नुकतीच राखी सावंतने फिल्मज्ञानच्या पॉडकास्टवर बोलताना सांगितलं की, तिला शाहरुखचे स्पर्म हवे आहेत. याबद्दल बोलताना राखी म्हणाली, मी कोणाचेही स्पर्म घेवू शकते. आणि बाळाला जन्म देवू शकते. बॉलीवूड स्टार असो की मग हॉलिवूड स्टार, ते त्यांचे स्पर्म मला डोनेट करु शकतात. म्हणजे मी आई होवू शकते. यानंतर तिला विचारण्यात येतं की, असा कोणता अभिनेता आहे ज्याला तुला त्याला बाबा बनवायला आवडेल. यावर राखी शाहरुखचं नाव घेते. 

राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती बोलताना दिसतेय की, 'शाहरुख खान मला त्याचे स्पर्म देऊ शकतो आणि मी सरोगेट करू शकते.' पुढे ती असंही म्हणते की, त्याची मुलं किती क्यूट आहेत. राखीला कॉन्ट्रोवर्सी क्वीनही म्हटलं जातं. नेहमीच ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता तिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. अनेकांनी तिला तिच्या या वक्तव्यामुळे ट्रोल करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कमेंट्स बॉक्समध्ये राखी सावंतचा ट्रोलर्स चांगलाच क्लास घेत आहेत. अनेकांनी राखीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. काही दिवसांपुर्वी राखी आदिल खान दुर्रानीसोबतच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आली होती. आधी रिलेशनशिप मग अचानक लग्न आणि अचानक घटस्फोट या सगळ्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. यानंतर तिने आदिलवर फसवणूक आणि तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिला जेलमध्येही जावं लागलं होतं. यानंतर आदिलने तिच्यावर खोटे आरोप केल्यामुळे गुन्हा दाखल केला होता. यानंतर आदिल खान दुर्रानी शर्लिन चोप्रासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला होता.