उर्फीला टक्कर देतेय ही अभिनेत्री, चक्क पोत्यात बसून निघाली..., पाहा तुम्हाला ओळखता येते का?

Urfi Javed And Rakhi Sawant: उर्फी जावेदला टक्कर देण्यासाठी एका बॉलिवूड अभिनेत्रीने विचित्र फॅशन केली आहे. तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 22, 2023, 10:04 AM IST
उर्फीला टक्कर देतेय ही अभिनेत्री, चक्क पोत्यात बसून निघाली..., पाहा तुम्हाला ओळखता येते का? title=
Rakhi Sawant Copy Urfi Javed Fashion Wore A Sack watch video

Urfi Javed And Rakhi Sawant:  चित्र-विचित्र फॅशन सेन्समुळं उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत आली आहेत. तिची फॅशन नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरते. तर, अनेकांना तिची ही विचित्र फॅशन खटकते आणि मग तीला ट्रोल केले जाते. आता आणखी एका अभिनेत्रीनेही उर्फीच्या पावलावर पाऊल ठेवत अतरंगी फॅशन केली आहे. अभिनेत्री राखी सावंतही आता उर्फीला टक्कर देताना दिसली आहे. राखी सावंतनने नेमकं काय केलंय, हे तुम्हीच पाहा. (Rakhi Sawant Fashion)

Voompla च्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यात अंगावर पोतं घेऊन एक तरुणी उतरताना दिसत आहे. नियोन रंगाच्या आउटफिटवर तरुणीने वर पोतं परिधान केले आहे. तर डोळे आणि नाकावरचा गोल आकारात कापण्यात आला आहे. सुरुवातीला नक्की कोण आहे असा प्रश्न युजर्सना पडला आहे. नंतर कारमधून खाली उतरल्यानंतर ती राखी सावंत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

राखी सावंत कारमधून उतरल्यावर पॅपाराझीसोबत बोलतानासुद्धा दिसून येत आहे. राखी सावंतच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. तर, काही युजर्सने राखी उर्फी जावेदची कॉपी करत असल्याचे म्हटले आहे. तर, काहींना सुरुवातीला ही राखी नसून उर्फी असल्याचे काहींना वाटले. राखीची ही विचित्रव फॅशन पाहून नेटकऱ्यांनी डोक्यावर हातच मारुन घेतला आहे. काहींनी तर ती उर्फी जावेदची खिल्ली उडवण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखी सावंतने अभिनेत्री मलायका अरोराच्या वॉकचीही खिल्ली उडवली होती. तिचा हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत धारेवर धरले होते.

राखी सावंत सतत नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असते. आदिल दुरानीसोबतचे लग्न असो किंवा त्यानंतरचे त्यांचे नाते. अलीकडेच राखीने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा पंडालमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने बंगाली लूक करत पूजेत सहभागी झाली होती. मात्र, राखीच्या या लूकवरुन नेटकऱ्यांनी तिच्यावर आगपाखड केली होती. राखीने धर्म परिवर्तन केले होते, मग ती आता दूर्गेपुजेला कशी आली? असा सवाल त्यांनी केला आहे.