VIDEO: मोबाईल पाहण्यात मग्न होती काजोल, दुसऱ्याच क्षणी तोल गेला अन्...

Kajol Falls While Watching Mobile: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे काजोलच्या एका व्हायरल व्हिडीओची. सध्या यातून तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे काजोल मोबाईल पाहता पाहता खाली पडतो. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 21, 2023, 08:16 PM IST
VIDEO: मोबाईल पाहण्यात मग्न होती काजोल, दुसऱ्याच क्षणी तोल गेला अन्...  title=
Kajol fall down badly while watching moblie phone

Kajol Falls While Watching Mobile: काजोल ही आपल्या सर्वांचीच अभिनेत्री आहे. तिचेही अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्याही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी मोबाईलमध्ये पाहत पाहत तिला दिसलंच नाही की आपल्या पुढ्यात काय आहे, तेवढ्यात तिचा तोल जातो आणि ती पडते. काजोलचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत ज्यात ती बऱ्याचदा धडपडताना दिसते आहे. आताही तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आपण सगळेच इतके मोबाईलमध्ये हल्ली व्यस्त असतो की आपल्यालाही कधी कळत नाही की आपण त्यात किती मग्न झालो आहोत ते. अनेकदा सेल्फी काढण्याच्या नादात तोल जातो तर कधी व्हिडीओ. अनेकदा अशांवर टीका होते की त्यांचे आत्ताच्या पिढीला काहीच शिस्त नाही आणि अगदी बेपरवा आहे. तेव्हा अशावेळी योग्य ती काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. 

सध्या नवरात्र सुरू आहे. तेव्हा सर्वत्र देवीचा गजर पाहायला मिळतो आहे. नवरात्रोत्सव सध्या फारच थाटात पार पडतो आहे. यावेळी मोठ मोठे बॉलिवूड सेलिब्रेटीही सध्या देवीच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी अभिनेत्री काजोलही स्पॉट झाली होती. सुंदर अशा पारपंरिक कपड्यात आलेल्या कजोलनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. काजोल ही अनेकदा नवरात्रीसाठी हजेरी लावताना दिसते. त्यामुळे तिची अशावेळी विशेष चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या याच व्हायरल व्हिडीओची. चला तर मग पाहुया की नक्की यावेळी नेमकं घडलं काय आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही काजोलला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 

हेही वाचा : अभिनयाचा अनुभव नसताना खोटं सांगून ऑडिशन गेला, आता आहे स्टार अभिनेता...

यावेळी काजोलचा मुलगा युगही तिच्यासोबत आलेला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी घडतं असं की मोबाईलमध्ये पाहता पाहता काजोलचा तोल जातो आणि मग ती धडपडते आणि सोबतच तिला मोबाईलही हवेत उडतो. यातूनही काजोल सावरून पुन्हा फोनवर बोलायला लागते. यावेळी तिची बहीणही तिला सावरताना दिसते. सध्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजोल ही सध्या आपल्या या व्हिडीओमुळे बरीच चर्चेत आहे. यावरून हे लक्षात घेणे ग्राह्य आहे की मोबाईलचं एडिक्शन हे आपल्यासाठी फारच हानिकारक आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.