मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आज फक्त बॉलिवूडचीचं नाही तर हॉलिवूडमधील देखील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ती रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिच्याबद्दल तुफान चर्चा रंगत असतात. सध्या प्रियंकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खुद्द प्रियंकाने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ सिमी गरेवालने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिमीने प्रियंकाला अभिनेता अभिषेक बच्चनसोबत असलेल्या नात्याबद्दल विचालं. तेव्हा प्रियंका एका सिनेमाचं प्रमोशन करत होती.
सिनेमात तिच्यासोबत अभिनेता अभिषेक बच्चन देखील होता. व्हिडीओमध्ये प्रियंकाने अभिषेक वेडा असल्याचं सांगितलं, ती पुढे म्हणाली, 'मी अभिषेकचा फोन चोरला आणि राणी मुखर्जीला I Miss You... तू कुठे आहेस.. असा मेसेज पाठवा...'
अभिषेकच्या फोनवरून प्रियंकाने पाठवलेल्या मेसेजला राणीने उत्तर देखील दिलं, ती म्हणाली, 'तू ठिक तर आहेस ना?' प्रियंकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेकचं नातं...
अभिषेक आणि राणी यांनी 'कभी अलविदा ना कहना', 'बंटी और बबली' आणि 'युवा' सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली होती. शुटिंग दरम्यान त्यांच्यात प्रेमाचा गुलाब फुलला. पण दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही.