लोकप्रिय अभिनेत्री रुममध्ये येताच लाईट बंद झाली आणि पुढे जे झालं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला

ही अभिनेत्री जेव्हा एका बंद खोलीमध्ये गेली, तेव्हा तिथली लाईट बंद झाली, अंधार पसरला. 

Updated: Feb 28, 2022, 11:58 AM IST
लोकप्रिय अभिनेत्री रुममध्ये येताच लाईट बंद झाली आणि पुढे जे झालं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोणतीही अभिनेत्री ज्यावेळी कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा तिचं रुप पाहून अनेकांच्यातच नजरा तिच्यावर खिळतात. अशीच एक अभिनेत्री मालिकांच्या माध्यमातून अगदीच सोज्वळ भूमिका साकारत तिचा प्रेक्षकवर्ग निर्माण करत राहिली. पाहता पाहता ती इतकी प्रसिद्ध झाली, की कमी वयातील तिचं यश सर्वांच्या शाबासकीस पात्र ठरलं. 

अशीच ही अभिनेत्री जेव्हा एका बंद खोलीमध्ये गेली, तेव्हा तिथली लाईट बंद झाली, अंधार पसरला. 

काळोखात एक प्रकाशझोत तिच्यावर पडला आणि त्यानंतर जे झालं ते  पाहणाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या. 

लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये एखाद्या सुंदर परीसारखी समोर असणारी ही अभिनेत्री म्हणजे टीना दत्ता. 

टीनानं नुकतंच तिचं नवं फोटोशूट सोशल मीडियाच्या माध्मातून चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. या फोटोमध्ये आजुबाजूला काळोख आणि त्यातच सोनेरी रंगात झळाळून निघातेली तिची कांती लक्ष वेधत आहे. 

टीनाचं हे फोटोशूट त्या अंधकारालाही प्रकराशमान करणारं ठरत आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणारी हीच टीना कायम फोटोशूटसाठी काही नव्या संकल्पनांची साथ घेताना दिसते. यावेळीही तिनं अशाच संकल्पनेला प्राधान्य दिलं. 

हाती आलेले फोटो पाहता तिची ही निवड चुकलेली नाही, हेच पुन्हा सिद्ध झालं.