'बिग बॉस'मुळे आर्यन खानची वकील अडचणीत! वकिलीची सनद रद्द होणार?

Bigg Boss 17 : आर्यन खान प्रकरणात वकील सना रईस खानने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सना रईस खानच्या लढ्यामुळे आर्यन खानला तुरुंगाबाहेर पडण्यास मदत झाली होती.

आकाश नेटके | Updated: Oct 19, 2023, 03:25 PM IST
'बिग बॉस'मुळे आर्यन खानची वकील अडचणीत! वकिलीची सनद रद्द होणार? title=

Bigg Boss 17: बॉलिवुड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा बिग बॉस 17 चा (Big Boss 17) सीझन सुरु झाला आहे. या रिअॅलिटी शोला एक आठवडासुद्धा पूर्ण झालेला नसताना त्यातील स्पर्धकांवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून विविध स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यामध्ये टीव्ही स्टार, युट्यूबर, गेमर, वकील यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी वकील सना रईस खानचाही समावेश आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणातही सना रईस खान (Sana Raees Khan) वकील होती. मात्र आता या कार्यक्रमात सहभागी झाल्याने सना रईस अडचणीत आली आहे.

बिग बॉस 17 मध्ये सहभागी झालेली सना रईस खान हायप्रोफाईल वकील आहे. बिग बॉसमध्ये तिने प्रवेश केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. कारण कोणत्याही वादासोबत तिचं नाव जोडलं गेलं नव्हतं. तसेच ती तिच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी प्रसिद्ध नव्हती. मात्र बिग बॉसमध्ये येताच ती प्रसिद्धीच्या झोतात आली. पण आता वकील असलेल्या सनाला बिग बॉसमध्ये जाणे महागात पडण्याची शक्यता आहे.

सना रईस खान ही मुंबईतील फौजदारी वकील आहे, जी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटले लढते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सना रईस देखील होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, सना रईस खान या प्रकरणात अवीन साहूची वकील होती. आर्यन खानला 2021 मध्ये मुंबईतील एका क्रूझमधून 6 जणांसह अटक करण्यात आली होती. यामध्ये या प्रकरणात जामीन मिळविणाऱ्या अवीन साहूचाही समावेश होता. सनाने न्यायालयात दावा केला होता की, अवीन साहू आणि आर्यन खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते. या दाव्याने अवीन साहूला जामीन मिळवून देण्यात सनाला यश आले आणि नंतर आर्यन खानच्या वकिलानेही हा मुद्दा वापरला होता.

सनाने तोडले नियम?

वकील आशुतोष दुबे यांनी सनाच्या शोमध्ये सहभागी होण्यावर आक्षेप घेतला असून हे बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. आशुतोषने यासंदर्भात एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. 'मी बार कौन्सिल ऑफ इंडियाला औपचारिकपणे कळवले आहे की अॅडव्होकेट सना रईस खानने 'बिग बॉस 17' या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे जे बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन करत आहे,' असे वकील आशुतोष दुबे यांनी म्हटलं आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियम 47 ते 52 नुसार वकील इतर कोणत्याही नोकरीद्वारे कमाई करू शकत नाहीत. याशिवाय, 1961 च्या कलम 49(1)(सी) अन्वये, प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना इतर कोणत्याही क्षेत्रात पूर्णवेळ नोकरी करण्यास मनाई आहे.

बिग बॉस 17 चे स्पर्धक

बिग बॉस 17 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या यादीत अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट आणि ईशा मालवीय, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, सोनिया बन्सल, अनुराग डोवाल, जिग्ना वोरा, फिरोझा खान (खानजादी), सनी आर्या (तहलका प्रँक), रिंके धवन, अरुण श्रीकांत मशेट्टी (अचानक भयानक) आणि नवीद सौले. यांचा समावेश आहे.